अमरावती : दाट धुक्यात हरवले विदर्भाचे नंदनवन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chikhaldara
नागपूर : दाट धुक्यात हरवले विदर्भाचे नंदनवन

अमरावती : दाट धुक्यात हरवले विदर्भाचे नंदनवन

चिखलदरा : दाट धुक्यात हरविलेली गर्द हिरवी वनराई, धुक्यातून वाट काढत असताना जणू अवकाश टेकल्याचा होणार आभास, बोचरी गुलाबी थंडी, असे विहंगम दृश्य सध्या विदर्भाचे नंदनवन(vidarbha paradise) असलेल्या चिखलदऱ्यात(chikhaldara) अनुभवायला मिळत आहे. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेली पावसाची संततधार तसेच दाट धुक्यामुळे चिखलदरा पर्यटकांना खुणावत आहे. विशेष म्हणजे, मागील दोन दिवसांपासून निर्माण झालेल्या वातावरणामुळे पर्यटकांना येथे काश्मीरचे फिल येत आहे.

हेही वाचा: कौटुंबिक कलह : आईची दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

चिखलदरा हे विदर्भाचे नंदनवन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाते. हजारो पर्यटक दरवर्षी येथे भेट देतात. चिखलदऱ्याला जाताना येणारी घाटवळणे, घनदाट जंगल या सगळ्यांबरोबरच मनसोक्त जंगलात भटकंती ही देणगी निसर्गाकडून लाभली आहे. सध्याच्या वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक चिखलदऱ्यात दाखल होताहेत. शनिवारी (ता. आठ) रात्री अचानक वातावरणात बदल होऊन रात्रभर अवकाळी पाऊस झाला. सारखा रात्रभर थांबून थांबून पाऊस कोसळत होता. हा अनुभव पर्यटकांसाठी अनपेक्षित होता. सकाळी चिखलदरा व आजूबाजूच्या परिसरात सगळीकडे दाट धुके पसरले होते. सकाळी उठल्यावर काश्मिरात असल्याचा आभास होण्याइतपत दाट धुक्याची चादर सर्वदूर पसरली होती. एकूणच पर्यटकांना विदर्भाच्या नंदनवनात एक वेगळाच आनंद अनुभवण्याची संधी या निमित्ताने मिळाली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top