esakal | घरावर आकाशातून अचानक येऊन पडली ती वस्तू आणि...
sakal

बोलून बातमी शोधा

parashoot

आज, बुधवारी सकाळी ७ च्या सुमारास पॅराशूट सदृश मोठा फुगा आकाशातून जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती मोरेश्वर कटरे यांच्या घरासमोरील दखणे यांच्या घरावर येऊन पडला. आपल्या घरावर काय पडले हे पाहण्यासाठी ते बाहेर पडले असता त्यांना खूप मोठ्या आकाराचा फुगा दिसला. त्यांनी याची माहिती परिसरातील नागरिकांना दिली.

घरावर आकाशातून अचानक येऊन पडली ती वस्तू आणि...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गोरेगाव (जि. गोंदिया) :  तालुक्यातील चिचगाव येथे पॅराशूट सदृश मोठा आकाराचा फुगा बुधवारी ( ता. ८) सकाळी ७ वाजता दखणे यांच्या घरावर पडला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

वास्तविकता जाणून घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. आज, बुधवारी सकाळी ७ च्या सुमारास पॅराशूट सदृश मोठा फुगा आकाशातून जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती मोरेश्वर कटरे यांच्या घरासमोरील दखणे यांच्या घरावर येऊन पडला. आपल्या घरावर काय पडले हे पाहण्यासाठी ते बाहेर पडले असता त्यांना खूप मोठ्या आकाराचा फुगा दिसला. त्यांनी याची माहिती परिसरातील नागरिकांना दिली.

लगेच सर्वांनी काय आहे ते पाहिले. यावेळी त्यात दोन किट आढळून आले. विशेष म्हणजे त्या किट वर 'मौसम विभाग के महानिदेशक का कार्यालय,  भारत मौसम विज्ञान विभाग लोधी रोड नवी दिल्ली 'असे लिहिले आहे.

सविस्तर वाचा - कोरोनाच्या तपासणीबाबत नितीन गडकरींनी दिले हे महत्वपूर्ण आदेश

यावरून सदर पॅराशूट सदृश हे भारतीय हवामान खात्याचे माहिती दर्शक उपक्रमाचे साधन असावे, असे जाणवत आहे. विशेष म्हणजे घरावर पडल्यानंतरही त्या दोन किटमध्ये लाइट जळत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

loading image