पर्रिकर सर्वोत्कृष्ट सरंक्षणमंत्री

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

नागपूर : भारतीय सीमेवर युद्धजन्य स्थिती उद्‌भवल्यास लष्कर सिद्ध राहायला हवे. मुळात सतत दहा दिवस युद्ध चालले तरी आपण सक्षम असणे गरजेचे आहे. इतका दूरगामी विचार करणारे संरक्षणमंत्री केवळ मनोहर पर्रिकर होते. म्हणूनच मी त्यांना सर्वोत्कृष्ट मानत असल्याचे मत मेजर जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी व्यक्त केले. प्रहार समाज जागृती संस्थेद्वारे संचालित प्रहार मिलिटरी स्कूल येथील अण्णासाहेब गोखले सभागृहात कारगिल विजय दिनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला कारगिल युद्धात प्रत्यक्ष सहभागी झालेले लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

नागपूर : भारतीय सीमेवर युद्धजन्य स्थिती उद्‌भवल्यास लष्कर सिद्ध राहायला हवे. मुळात सतत दहा दिवस युद्ध चालले तरी आपण सक्षम असणे गरजेचे आहे. इतका दूरगामी विचार करणारे संरक्षणमंत्री केवळ मनोहर पर्रिकर होते. म्हणूनच मी त्यांना सर्वोत्कृष्ट मानत असल्याचे मत मेजर जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी व्यक्त केले. प्रहार समाज जागृती संस्थेद्वारे संचालित प्रहार मिलिटरी स्कूल येथील अण्णासाहेब गोखले सभागृहात कारगिल विजय दिनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला कारगिल युद्धात प्रत्यक्ष सहभागी झालेले लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मंचावर प्रहार समाज जागृती संस्थेच्या अध्यक्षा शमा देशपांडे व शाळेच्या मुख्याध्यापिका शुभा मोहगावकर उपस्थित होत्या. कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला व भारताकडे सुसज्ज वायुसेना होती. तरीही कारगिल युद्धात आपण वायुसेनेचा उपयोग न करणे दुर्दैवी असल्याचे मत व्यक्‍त केले.निंभोरकर यांनी सर्जिकल स्ट्राइकची माहिती दिली. विसाव्या कारगिल दिवसाच्या या कार्यक्रमात प्राणाची बाजी लावून पाकिस्तानी सैन्याला शरणागती पत्करण्यास भाग पाडणाऱ्या शहिदांना आदरांजली वाहण्यात आली. दहावीच्या विद्यार्थ्यांनी पीपीटीद्वारे कारगिल युद्धातील शहीद जवानांची माहिती दिली. आयोजनासाठी शर्मिष्ठा नाग, शीतल बागेश्‍वर आणि सतीश मोरे यांनी सहकार्य केले. प्रास्ताविक प्रहार समाज जागृती संस्थेच्या विश्‍वस्त फ्लाइट लेफ्टनंट शिवाली देशपांडे यांनी केले. संचालन तपस्यू मेश्राम यांनी केले. आभार मुख्याध्यापिका शुभा मोहगावकर यांनी मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parrikar is the best defense minister