पारशिवनी तहसील कार्यालय पडले ओस 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

पारशिवनी(जि.नागपूर) : निवडणूक कामानिमित्त पारशिवनी येथील तहसीलदार, अधिकारी, कर्मचारी रामटेक येथे गेले असल्याने पारशिवनी तहसील कार्यालय ओस पडले आहे. तहसील कार्यालयात येणारे नागरिक आल्यापावली परत जात आहेत, तर तहसीलदार, नायब तहसीलदार, बाबू व कर्मचारी नसल्याने नागरिकांची गरजेची कामे होत नसल्याने नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. 

पारशिवनी(जि.नागपूर) : निवडणूक कामानिमित्त पारशिवनी येथील तहसीलदार, अधिकारी, कर्मचारी रामटेक येथे गेले असल्याने पारशिवनी तहसील कार्यालय ओस पडले आहे. तहसील कार्यालयात येणारे नागरिक आल्यापावली परत जात आहेत, तर तहसीलदार, नायब तहसीलदार, बाबू व कर्मचारी नसल्याने नागरिकांची गरजेची कामे होत नसल्याने नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. 
उत्पन्नाचे दाखले असो वा महसुली विभागाशी संबधित कामे असो, ती कुणी येथे जबाबदार अधिकारी नसल्याने रेंगाळली असून अनेकांना या प्रकारामुळे मनस्ताप सहन करावा लागतो. सकाळपासून तालुक्‍यातील नागरिक आपल्या कामासाठी येथे येत असताना कार्यालयात कुणीच अधिकारी उपलब्ध नसल्याने आल्या पावली परत जातात. लहानांपासून वृद्धांपर्यंत तालुक्‍यातील नागरिक येथे येत आहेत. लहान मोठी कामे जर अधिकारी नसल्याने ती कामे प्रलंबित असून नागरिकांच्या अडचणी सोडविण्याकरिता या कार्यालयात अधिकारी नसल्याने त्या सोडणार कोण, हा प्रश्न निर्माण झाला आहे. रामटेक येथे गेलेल्या तहसीलदारांना परत पारशिवनी येथील कार्यालयात परत पाठवा, अशी मागणी होत असून निवडणुकीकरिता पारशिवनी तहसील कार्यालय ओस का ठेवण्यात येत आहे,असाही प्रश्न नागरिक करीत असून तहसील कार्यालय असताना तहसीलदारच नसेल तर तहसील काय कामाची?असा प्रश्‍न जनता करू लागली आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्यास पारशिवनी तहसील कार्यालयातूनही तहसीलदार व कर्मचाऱ्यांची निवडणूक काळात सेवा देता आली असती. पण, येथील तहसलीदारांसह कर्मचाऱ्यांना नियमित कार्य रामटेक कार्यालयात पाचारण करण्यात आल्याने पारशिवनी तहसील कार्यालय वाऱ्यावर पडले आहे. या कार्यालयात नियमित तहसीलदार व कर्मचाऱ्यांना पूर्ववत पारशिवनी तहसील कार्यालयात रुजू करावे, अशी मागणी जलिम शेख, राजेश कुंभलकर, डुमन चकोले, आशीष भड, शुभम राऊत, वैभव खोब्रागडे, नरेश भिवगडे, राजकुमार राऊत व इतर नागरिकांनी केली आहे.
निवडणुकीच्या कामानिमित्त उपविभागीय अधिकारी रामटेक यांच्या आदेशान्वये पारशिवनी येथील मी, इतर अधिकारी, कर्मचारी व अन्य रामटेक येथील एसडीओ कार्यालयात निवडणूक कामात 24 सप्टेंबरपासून कार्यरत आहोत. वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे. 
वरुणकुमार सहारे 
तहसीलदार, पारशिवनी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parshivani tahsil office fell dew