अंशकालीन शिक्षक नियुक्तीचा मार्ग मोकळा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

यवतमाळ : जिल्ह्यातील पदवीधर अंशकालीन शिक्षकांची समुपदेशनाची प्रक्रिया बुधवारी (ता.18) जिल्हा परिषदेच्या सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाली. त्यामुळे या शिक्षकांना प्राथमिक शिक्षण विभागामार्फत लवकरच नियुक्तीचे आदेश देण्यात येणार आहेत. त्यामुळे या शिक्षकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला असून, शिक्षकांच्या रिक्तपदांचा प्रश्‍नसुद्धा आता बऱ्यापैकी सुटणार आहे.

शासनाने बुधवारी (ता.4) जारी केलेल्या "जीआर'नुसार प्राथमिक शिक्षण विभागातर्फे शिक्षकांची समुपदेशनाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याबरोबरच पदवीधर अंशकालीन शिक्षकांचेसुद्धा समुपदेशनाची प्रक्रिया राबविण्यात आली. यादरम्यान जिल्ह्यातील 139 पदवीधर अंशकालीन शिक्षकांचे समुपदेशनाची प्रक्रिया बुधवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात घेण्यात आले. जिल्ह्यातील महागाव, उमरखेड व पुसद या तीन तालुक्‍यांत शिक्षकांची मोठ्या प्रमाणात पदेरिक्त आहेत. त्या रिक्त पदांवर पदवीधर शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. काही प्रमाणात रिक्त पदांचा प्रश्‍नदेखील यामुळे सुटणार आहे. त्याबरोबरच प्राथमिक शिक्षण विभागाला प्राप्त आदेशानुसार त्यांनी शिक्षकांची वर्गवारी करून मंगळवारी प्राथमिक शिक्षकांचीदेखील समुपदेशनाची प्रक्रिया राबविली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: part-time teacher appointment