निर्ढावले कर्मचारी... निराधार महिलेचे बॅंक पासबुक फाडले, काय होते कारण 

The passbook of the destitute woman was torn by Bank Staff
The passbook of the destitute woman was torn by Bank Staff
Updated on

मूल (जि. चंद्रपूर) :  सर्वसामान्य, गरीब नागरिकांना लहानसहान गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो, हे काही नवीन नाही. आता तर कोरोनामुळे जीवनच बदलले असून, प्रत्येकाची जगण्यासाठी धडपड सुरू आहे. सोशल डिस्टन्सिंग, कोरोनाच्या भीतीमुळे प्रत्येक कार्यालयात येणाऱ्यांना हीन वागणूक दिली जाते. शासकीय कार्यालये, बॅंक आदी ठिकाणी हेच चित्र आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भारतीय स्टेट बॅंकेच्या शाखेत असाच संतापजनक प्रकार उघडकीस आला.    

कोरोनामुळे हाताला काम नसल्याने अनेक जणांचे खाण्याचे वांदे आहेत. निराधार महिलांची स्थिती अधिक बिकट आहे. शासनाकडून मिळणाऱ्या फूल ना फुलाची पाकळी मदतीवर अनेकांची आशा असते. बॅंकेत आधार लिंक करण्यासाठी गेलेल्या अशाच एका महिलेचे पासबुकच कर्मचाऱ्याने फाडून टाकल्याचा धक्कादायक प्रकार येथील भारतीय स्टेट बॅंकेत गुरुवारी घडला. या घटनेने निराधार महिला पुरती गोंधळली. बॅंकेने हे प्रकरण नंतर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या प्रकरणाची येथील आम आदमी पक्षाने तालुका प्रशासनाकडे बॅंकेच्या विरोधात तक्रार केली आहे.

कोरोनाच्या काळात लॉकडाऊनच्या परिस्थितीत केंद्र शासनाने निराधार महिलांना अनुदान दिले. अनुदानाची रक्कम बॅंकेत जमा करण्यात आली. केंद्र शासनाच्या जनधन या योजनेत बऱ्याच महिलांनी बॅंकेत आपआपले खाते उघडले आहे. अशाच प्रकारचे खाते येथील भारतीय स्टेट बॅंकेच्या मूल शाखेत चिरोली येथील अरुणा मोहुर्ले या वृद्ध महिलेने उघडले होते. आज ती आधार लिंक करण्यासाठी बॅंकेत गेली असता येथील एका कर्मचाऱ्या पासबुक जुने झाल्याचे कारण सांगितले. 

तिच्यासमोरच पासबुक फाडून कचऱ्याच्या पेटीत टाकले. बॅंकेच्या वागणुकीने अपमानित झालेल्या या महिलेने कचऱ्याच्या पेटीतून आपले फाडलेले पासबुक उचलून घरी नेले. प्रत्येक बॅंकेने ग्राहकांशी सौजन्याने वागावे, असे केंद्रशासनाचे निर्देश आहेत. तरीही वृद्ध महिलेला भारतीय स्टेट बॅंकेत फटका बसला.

दरम्यान, याप्रकरणाची येथील आम आदमी पक्षाने दखल घेतली. बॅंकेच्या विरोधात मूल येथील उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. हे प्रकरण गंभीर असल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आपचे गौरव श्‍यामकुळे आणि तालुका अध्यक्ष अमित राऊत यांनी केली आहे.

संपादन : अतुल मांगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com