अरे हे काय! परप्रांतिय कामगारांची हे पण करयातायेत लुट; असा घडतोय प्रकार

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 May 2020

अकोला जिल्ह्यातील परप्रारंतीय कामगारांना त्यांच्या गावी परत जाण्यासाठी रेल्वे आणि बसची व्यवस्ता करण्यात आली आहे. टाळेबंदीमुळे हाताच रोजगार गमावणारे परप्रांतीय कामगार गावी परत निघाले आहेत

अकोला : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे आधीच हतबल झालेला परप्रांतिय कामगारांची अकोला बस स्थानक प्रशासनाकडून लुट करण्यात आली. अकोला ते अमरावती दरम्यानच्या 99 किलोमीटर प्रवासासाठी नियमित भाडे 129 रुपये असताना उत्तर प्रदेशात रेल्वे गावी जाण्यासाठी अमरावती निघालेल्या प्रवाशांकडून अकोल्यात तब्बल 354 रुपये भाडे आकारण्यात आले. अकोला येथील 16 बसने एकूण 440 प्रवशांना पाठविण्यात आले.

अकोला जिल्ह्यातील परप्रारंतीय कामगारांना त्यांच्या गावी परत जाण्यासाठी रेल्वे आणि बसची व्यवस्ता करण्यात आली आहे. टाळेबंदीमुळे हाताच रोजगार गमावणारे परप्रांतीय कामगार गावी परत निघाले आहेत. त्यांच्यासाठी राज्यातून विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यात येत आहेत. उत्तर प्रेदशसाठी अमरावती विभागातून दुसरी श्रमिक रेल्वे अमरावती स्थानकावरून शनिवारी सायंकाळी रवाना झाली. या रेल्वेने अकोला जिल्ह्यातील  ४४० कामगार त्यांच्या गावाकडे निघाले आहेत. त्यांना अकोला मध्यवर्ती बस स्थानकावरून शनिवारी दुपारी अमरावती रेल्वे स्थानकावर पाठविण्यात आले.

आवश्यक वाचा - हृदयद्रावक : घरी जाण्याचा परवाना मिळाल्याने झाला होता आनंद, मात्र घरी पोहोचण्याआधीच क्षणार्धात बदलला दुःखात

बसला प्रासंगिक कराच्या अनुषंगाने भाडे
बस प्रवासाचे भाडे एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून जारी झालेल्या मार्गदर्शक तत्वानुसारच आकारण्यात आले आहे. बस उपलब्ध करुन देताना मागणी केलेल्या गावाचे जाण्या-येण्याच्या अंतरासाठी ४४ रुपये प्रती कि.मी.प्रमाणे दर आकारण्यात येतो. परप्रांतीयांसाठी सोडण्यात आलेल्या बसला प्रासंगिक कराच्या अनुषंगाने भाडे आकारण्यात आले आहे.
- स्मिता सुतावणे, वाहतूक अधिकारी, एसटी, अकोला.

निर्णय हा एसटी प्रशासनाचा
महसूल विभागाने परप्रांतीय प्रवासी व राज्य परिवहन महामंडळ (एसटी) यांच्यात समन्वकाची भूमिका पार पाडली. दर आकारणीचा निर्णय हा एसटी प्रशासनाचा आहे.  
 – प्रा. संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला

सोशल डिस्टन्सिंग पाळताना प्रशासनाची तारांबळ
कामगारांना त्यांच्या गावी परत पाठविताना शासनाने बस व रेल्वेचे नियोजन केले असले तरी सर्व नियम पाळूनच त्यांना परत पाठविले जात आहे. एका बसमध्ये 22 प्रवाशांच्यावर प्रवाशी बसविण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे अकोला रेल्वे स्थानकावरून तब्बल 20 बसने कामगारांना रवाना करताना त्यांच्याकडून सोशल डिस्टन्सिंग पाळून घेताना प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.बस स्थानकावर प्रवाशांना पाण्यासाठी सुद्धा भटकंती करावी लागली.

भोपाळ रेल्वे तीन तास उशिरा
अकोला रेल्वे स्थानकावरून मध्यप्रदेशातील 1200 कामगारांना शुक्रवारी श्रमीक रेल्वेने भोपाळ येथे पाठविण्यात आले. ही गाडी 8.30 वाजता अकोला रेल्वे स्थानकावरून धावणार होती. मात्र गाडीला तब्बल 3 तास उशिर झाला. रात्री 11.30 वाजतानंतर भोपाळकरिता श्रमीक रेल्वे रवाना झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Passengers leaving for Amravati were charged Rs 354 in Akola