पुरात अडकलेल्या 18 प्रवाशांची सुटका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

मोर्शी (जि. अमरावती) : दमयंती नदीला आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालेले असतानाच शिरखेड येथे काशी नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यात राज्य परिवहन मंडळाच्या बसमधील 18 प्रवासी अडकलेत. संध्याकाळी अडकलेल्या या प्रवाशांची सुटका रात्री अकराच्या दरम्यान झाली. जीवनमरणाच्या खाईत अडकलेल्या प्रवाशांना जिल्हाधिकारी कार्यालयातील बचाव पथकाने संकटातून सुखरूप बाहेर काढले.

मोर्शीतील दमयंती नदीला पूर आल्याने त्याचे पाणी शिरखेडपर्यंत पोहोचले. येथील काशी नाल्यास त्यामुळे पूर आल्याने वाहतूक प्रभावित झाली. गुरुवारी सायंकाळी मोर्शी आगाराची बस (एचएच 40-4180) अडगाव येथे प्रवासी घेऊन गेली होती. परतीच्या प्रवासात रात्री आठच्यादरम्यान त्यांना पुराचा फटका बसला. नाल्यातील पुरात बस अडकली व सोबतच त्यामधील 18 प्रवाशांचा जीव टांगणीला लागला. बसचालक सुरेश मोतीराम पचारे व वाहक सारिका प्रवीण तिजारे यांनी तत्काळ धोक्‍याची सूचना मोर्शी आगाराला कळविली. सूचना मिळताच बचाव पथक शिरखेडला रवाना झाले. दोरीच्या साहाय्याने बसमधील 18 ही प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: passengers rescued from flood

टॅग्स