

Pataneel Ganpati
esakal
प्रशांत रागीवार
अहेरी (जि. गडचिरोली) : किर्र जंगल, उंचच उंच सागवान आणि बांबूच्या रांजी... अशा निसर्गरम्य वातावरणात आलापल्लीजवळ ‘पातानील गणेश’ विराजमान आहे. अरण्याच्या कुशीत वसलेला हा गणपती ‘नवसाला पावणारा गणपती’ म्हणून परिसरातील भाविकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू बनला आहे. विशेष म्हणजे, जंगलात हरवलेल्या हत्तीच्या शोधादरम्यान या गणपतीचा शोध लागल्याची आख्यायिका सांगितली जाते. अहेरी तालुक्यातील आलापल्ली-सिरोंचा मार्गावर आलापल्लीपासून सात किलोमीटर अंतरावर हा गणपती आहे.