मेयोतून रुग्णाला हलविले खासगीत

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर: मेयोत दाखल केल्यानंतर वैद्यकीय सेवा वेळेवर मिळाली नाही. त्यामुळे रुग्णाला खासगी सेवेकडे वळावे लागल्याची घटना सोमवारी रात्री घडली. सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला. गरिबांची काळजी मेयोत घेतली जाते का, यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, गांधीबाग परिसरातील एका ज्येष्ठ नगरसेवकाच्या मुलाची प्रकृती सोमवारी मध्यरात्री सुमारास अचानक खालावली. त्यांनी तातडीने घरापासून जवळ असलेले मेयो गाठले. केस पेपर काढल्यानंतर मेडिकल कॅज्युल्टी ऑफिसर (सीएमओ) यांच्याकडे घेऊन गेले. त्यांनी पाहिल्यावर अपघात विभागाच्याच वॉर्डमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. येथील एका नर्सने मुलाला सलाईन लावण्यासाठी कॅथेटर लावले. परंतु त्यानंतर एकही डॉक्‍टर किंवा नर्सने त्या मुलाकडे पाहिलेसुद्धा नाही. लोकप्रतिनिधीने याबाबत वॉर्डातील डॉक्‍टरांना व नर्सला किमान सलाइन तरी लावा, अशी विनंती केली. परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. दीड ते दोन तासावर वेळ होऊनही उपचार मिळत नसल्याचे पाहत लोकप्रतिनिधीने मुलाला खासगी इस्पितळात घेऊन जातो, असे सांगून नर्सला कॅथेटर काढण्याची विनंती केली. परंतु नर्सने मी खाटेजवळ येणार नाही, रुग्णाला माझ्याकडे आणा, असे फर्मान सोडले. मुलाला आधार देत नर्सजवळ आणले असता, नर्सने उभ्या उभ्याच कॅथेटर काढले. त्यातून रक्त बाहेर येताच मुलगा चक्कर येऊन खाली कोसळला. लोकप्रतिनिधीने याबात जाब विचारला असता, तेथील निवासी डॉक्‍टरनेच बाहर निकालो म्हणून सुरक्षारक्षकांना बोलाविले. मुलाची प्रकृती पाहून लोकप्रतिनिधीने वाद न घालता तातडीने खासगी इस्पितळ गाठले.

सीसीटीव्ही फुटेज तपासले
लोकप्रतिनिधीने या प्रकरणाची तक्रार मोबाईलद्वारे प्रभारी वैद्यकीय अधीक्षकांकडे केली. त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन अपघात विभागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, लोकप्रतिनिधीने सांगितलेला प्रकार खरा निघाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com