नातेवाईकांनी साथ सोडल्याने ते एकटे जात होते रुग्णालयात; माणुसकी म्हणून दोघांनी केली मदत, मात्र...

संतोष ताकपिरे
Thursday, 13 August 2020

पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज रात्रीच तपासले. सकाळीसुद्धा फुटेजची तपासणी सुरू होती. बुधवारी एक महिला चौकशीसाठी पीडीएमसीमध्ये आली. तिने पाहणी केल्यानंतर मृत व्यक्ती भाऊ असल्याचे सांगितले. तसेच त्याचे नाव अशोक महादेव उगळे (वय ५०, रा. नागपूर) असे असल्याचे तिने सांगितले.

अमरावती : रस्त्यावर कुणाचा अपघात झाला तर कुणीही मदतीसाठी जात नाही. पोलिसांच्या कारवाईचा सामना कोण करणार असा विचार त्यांच्या मनात येतो. आपल्या मागे त्रास का लावून घ्याचा असा यामागचा विचार असतो. यामुळेच कायद्यात बदल करण्यात आला आणि मदत करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रात न देण्याचा निर्णय सरकारने घेतला. आता प्रत्येकजण दुसऱ्याच्या मदतीला धावून जातो. मात्र, मदत करणाऱ्यांनीच घटनास्थळानरून पळ काढल्याने कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली.

प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी रात्री आठ ते साडेआठ वाजताच्या सुमारास एक व्यक्ती रुग्णालयात येत हेता. त्याला जास्त ताप असल्याने रुग्णालयात येत असताना कोसळला. हे तिथे उभे असलेल्या काही नागरिकांना दिसले. यावेळी दोन समजूतदार व्यक्ती त्याच्या मदतीसाठी धावून आले. त्यांनी त्याला उचलून रुग्णालयात दाखल केले.

जाणून घ्या - ‘बाळा... आईची काळजी घे, आता तुलाच सांभाळायचे आहे' वडिलांचे हे वाक्य मुलाला समजलेच नाही अन्...

परंतु, आपण ज्याची मदत केली ती व्यक्ती काही दिवसांपासून आजारी असल्याचे समजताच मदत करणाऱ्या नागरिकांनी घाबरून रुग्णालयातून पळ काढला. थोड्या वेळात ओपीडीतील डॉक्‍टरांनी रुग्णाची तपासणी केली. तेव्हा त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. परंतु, रुग्णाच्या जवळ कुणीच नसल्याने डॉक्‍टर व रुग्णालयातील कर्मचारीही घाबरले.

यानंतर घटनेची माहिती गाडगेनगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज रात्रीच तपासले. सकाळीसुद्धा फुटेजची तपासणी सुरू होती. बुधवारी एक महिला चौकशीसाठी पीडीएमसीमध्ये आली. तिने पाहणी केल्यानंतर मृत व्यक्ती भाऊ असल्याचे सांगितले. तसेच त्याचे नाव अशोक महादेव उगळे (वय ५०, रा. नागपूर) असे असल्याचे तिने सांगितले. त्यानंतर त्याला घेऊन येणाऱ्यांचाही शोध लागला. त्यांनी घाबरून असे केल्याचे पोलिसांना सांगितले.

ठळक बातमी - बापाची मुलीला आर्त विनवणी, 'बेटा मला येथून काढ, नाही तर मी मरून जाईन, मला जगायचे आहे तुमच्यासाठी'

त्याला कुटुंब नाही

मृत व्यक्तीला स्वत:चे कुटुंब नाही. दहा वर्षांपासून तो गाडगेनगर भागातील एका विधवा महिलेच्या मदतीने राहत होता, असे पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी सांगितले.

डॉक्‍टर, कर्मचाऱ्यांची तारांबळ

ज्या व्यक्तीला रुग्णालया मृत्यू झाला तो काही दिनसांपासून आजारी हेता. तसेच त्याच्यासोबत कुणीही नव्हते. ज्यांनी त्याची मदत केली त्यांनीही तो काही दिवसांपासून आजारी असल्याचे समजताच रुग्णालयातून पळ काढला. त्यामुळे डॉक्‍टर व तेथील कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

हेही वाचा - सावधान! पुढील दोन दिवसांत या जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

नातेवाईकांनीही सोडली साथ

रुग्ण काही दिवसांपासून बिमार असल्याने नातेवाईकांना कोरोना झाल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे रुग्णाला स्वःता रुग्णालयात याव लागल. माणुसकी म्हणून दोघांनी मदत केली. मात्र त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The patient who came to the hospital died in Amravati