
कारंजा (जि.वाशीम) : तालुक्याच्या सीमेवरील यवतमाळ जिल्ह्यात येणार्या नेर परसोपंत या गावातील एक व्यक्ती रविवारी (ता.3) उपचारासाठी शहरातील कांत हॉस्पिटल येथे आला होता. मात्र, डॉ. कांत यांनी समयसूचकता दाखवत सदर व्यक्तीस यवतमाळ येथेच परत पाठविले. मात्र, त्या व्यक्तीचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
पॉझिटिव्ह व्यक्तीचा कांत हॉस्पिटल मधील पाच जणांशी, पॅथॉलॉजी लॅबमधील दोघांशी व अन्य एका जणाशी संपर्क आला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आठ जणांना सामान्य जिल्हा रुग्णालय येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अशी माहिती तहसीलदार धीरज मांजरे यांनी दिली आहे. अधिक माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील नेर परसोपंत येथील शिक्षक असणारा सदर पॉझिटिव्ह व्यक्ती उपचारासाठी कांत हॉस्पिटलमध्ये आला होता. यावेळी डॉ. कांत यांनी त्याला असलेल्या आजाराच्या लक्षणावरून कार्यतत्परता दाखवित रक्त तपासणीसाठी शहरातील एका पॅथॉलॉजी लॅबमध्ये पाठविले.
तसेच त्याचा एक्सरे देखील करण्यात आला. या दोन्ही तपासणी अहवालावरून सदर इसम संशयित असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आल्याने त्यांनी समयसूचकता दाखवित लगेच यवतमाळ येथे पुढील उपचारासाठी पाठविले. त्यानंतर, यवतमाळ येथे त्याच्या घशाच्या स्त्रावाचे नमूने तपासणीसाठी पाठविले असता बुधवारी (ता.6) त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
हेही वाचा - अकोल्याचा मृत्यूदर राज्याच्या दुप्पट!
त्यामुळे कारंजा शहर सुद्धा कोरोना संक्रमित होते की, काय? अशी, भिती निर्माण झाली आहे. क्वारंटाईन करण्यात आलेल्या डॉक्टरसह एकूण आठ जणांचा वैद्यकीय अहवाल शुक्रवार (ता.8) सायंकाळपर्यंत किंवा शनिवारी (ता.9) सकाळपर्यंत उपलब्ध होईल सदर घटनेमुळे कारंजातही कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तपासणीसाठी पाठविलेल्या आठ जणांचा अहवाल काय येतो? याकडे कारंजा शहरवासींसह जिल्हावासींचे लक्ष लागले आहे.
त्या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आले
कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर पाच दिवसांनी घशाच्या स्त्रावाचे नमूने तपासणीसाठी पाठविले जातात. कारंजातील तीन डॉक्टरांसह अन्य पाच असे आठ जण रविवारी (ता.3) त्या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आले होते. त्यामुळे, शुक्रवारी (ता.8) सकाळी त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमूने तपासणीसाठी पाठविले जातील. तोपर्यंत, त्यांना जिल्हा रूग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
-डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा शल्यचिकित्सक वाशीम
यवतमाळ जिल्ह्यात भरती होण्याचा सल्ला दिला
माझा तो नियमित रुग्ण असल्याने तपासणी करिता आला होता. त्यावेळी त्याची लक्षणे लक्षात घेत, त्याला आपण भरती न ठेवता त्वरित सरकारी रुग्णालय यवतमाळ जिल्ह्यात भरती होण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्याचा बुधवारी (ता.6) कोरोना संसर्ग असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे आमच्या संपर्कातील आम्ही सर्व स्वतःहून क्वारंटाईन होऊन रुग्णालय 14 दिवस बंद राहणार आहे.
-डॉ. अजय कांत, रा. कारंजा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.