esakal | रुग्णाला ना स्ट्रेचर मिळाले ना व्हिलचेअर, आयसोलेशन कक्षात पोहोचण्यापूर्वीच गेला जीव

बोलून बातमी शोधा

corona dead

रुग्णाला ना स्ट्रेचर मिळाले ना व्हिलचेअर, आयसोलेशन कक्षात पोहोचण्यापूर्वीच गेला जीव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वर्धा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वांनाच धडकी भरली आहे. एकीकडे आरोग्य सुविधा वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी सामान्य रुग्णालयात मात्र सुविधांच्या अभावाने रुग्णांसह नातलगांना कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. एका रुग्णाला स्ट्रेचर, व्हिलचेअर न मिळाल्याने पायी आयसोलेशन कक्षापर्यंत जावे लागले. आयसोलेशन कक्षात पोहोचण्यापूर्वीच त्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. येथील परिस्थिती कधी सुधारणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हेही वाचा: वॉर्डबॉयनेच चोरले रेमडेसिव्हीर इंजेक्शन, कारागृहात रवानगी

जिल्हा सामान्य रुग्णालयात रविवारी (ता. २५) एका महिलेला उपचारार्थ आणले होते. कंबरेचे दुखणे असल्याने त्या महिलेला रुग्णालयात आणले होते. दरम्यान, रुग्ण कोविड पॉझिटिव्ह आल्याचे सांगितल्यानंतर कुटुंबीय तिला आयसोलेशन कक्षाकडे नेत होते. महिलेला दमाचादेखील त्रास होता. रुग्णाला व्हिलचेअर, स्ट्रेचर उपलब्ध करणे गरजेचे होते. पण, ही सुविधा न मिळाल्याने रुग्णाला पायी आयसोलेशन कक्षाकडे नेत होते. दरम्यान, अत्यवस्थ होत रुग्णाने आयसोलेशन कक्षात पोहोचण्यापूर्वीच जीव सोडला. रुग्णाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी टाहो फोडला. रुग्णांसाठी साधी व्हिलचेअरदेखील या रुग्णालयात उपलब्ध नाही काय, असा प्रश्न रुग्णाच्या नातलगांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

जिल्हा शल्यचिकित्सकांचा 'नो रिप्लाय'

जिल्हा सामान्य रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्णांची हेळसांड होत आहे. या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता ते कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यांच्या दूरध्वनीवर संपर्क केला असता नो रिस्पॉन्स मिळाला. आपत्ती व्यवस्थापनाच्या काळात जिल्हा सामान्य रुग्णालय सध्या रुग्णांसाठी धोकादायक ठरत आहे