विवेक पालटकर करणार होता आत्महत्या?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

नागपूर - पोटच्या पोरासह बहिणीचे कुटुंब यमसदनी धाडणाऱ्या विवेक पालटकरने लुधियानात खोलीत असलेल्या देवीच्या फोटोवर स्वतःचे नाव लिहून ‘क्रॉस’ केला होता. यावरून तो कमालीचा अस्वस्थ आणि नैराश्‍यात असल्याचे स्पष्ट होते. नावासमोरील क्रॉस तो आत्महत्येच्या विचारात असल्याचा संकेत देणारा आहे.

नागपूर - पोटच्या पोरासह बहिणीचे कुटुंब यमसदनी धाडणाऱ्या विवेक पालटकरने लुधियानात खोलीत असलेल्या देवीच्या फोटोवर स्वतःचे नाव लिहून ‘क्रॉस’ केला होता. यावरून तो कमालीचा अस्वस्थ आणि नैराश्‍यात असल्याचे स्पष्ट होते. नावासमोरील क्रॉस तो आत्महत्येच्या विचारात असल्याचा संकेत देणारा आहे.

विवेक याने ११ जूनला पहाटेच्या सुमारास जावई कमलाकर पवनकर, बहीण अर्चना, सासू मीरा, भाची वेदांती आणि मुलगा कृष्णा यांचा सब्बलने वार करून खून केला होता. या हत्याकांडाचा प्लॅन त्याने महिन्याभरापूर्वीच बनवला होता. त्याने किरायाच्या खोलीतील कॅलेंडरवर जून १० तारखेच्या रकान्यात पेनाने क्रॉस केले होते. त्या रकान्यात कमलाकर पवनकर यांचे नाव लिहिले होते. योजनेप्रमाणे त्याने १० जूनच्या मध्यरात्री जावयाचा काटा काढण्याची तयारी केली.

दोन दिवसांपूर्वीच सब्बल विकत आणून जावयाच्याच घरात ठेवली. कॅलेंडरवर मारलेल्या फुलीनंतर जावई कमलाकर यांचा सबलीने ‘गेम’ केला. मात्र, स्वतःची सुटका करून घेण्यासाठी त्याला अन्य चौघांचा खून करावा लागला. त्यानंतर तो लुधियानाला पळून गेला. तेथेही खोलीतील देवीच्या फोटोवर स्वतःचे नाव लिहिले होते आणि फुलीही मारली होती. त्यामुळे विवेक काही दिवसांत आत्महत्या करण्याच्या तयारीत होता, असा संशय तपास करणाऱ्या पथकातील अधिकाऱ्याने व्यक्‍त केला.

पांघरून घेतल्याने वाचल्या मितू-वैष्णवी
कमलाकर यांच्या आजूबाजूला वेदांती आणि कृष्णा झोपले होते. विवेकने सबलेचा फटका मारताच कमलाकरसह दोघांच्याही डोक्‍याला मार लागला. त्यानंतर बहीण अर्चनावर हल्ला केला. अर्चना यांच्या पायथ्याशी वैष्णवी आणि मिताली झोपल्या होत्या. कुलरची थंड हवा असल्यामुळे त्यांनी पांघरून घेतले होते. ही बाब विवेकलाही माहिती होती. त्या शांत झोपून असल्याने विवेकने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि पळ काढला.

Web Title: pavankar murder case vivek palatkar suicide crime