नागपूर : हत्याकांडातील आरोपीची माहिती देणाऱ्यास बक्षीस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

नागपूर - पाच जणांचा खून करणाऱ्या क्रूरकर्मा विवेक पालटकरचे पोलिसांनी छायाचित्र जारी केले असून माहिती देणाऱ्यास योग्य ते बक्षीस ठेवले आहे. आरोपीचे छायाचित्र फेसबुक, व्हॉट्‌सॲप, इन्स्टाग्राम आणि ट्‌विटरसह अधिकृत संकेतस्थळावरून प्रकाशित करण्यात आले आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यांतही छायाचित्र पाठवून पोलिसांना ‘अलर्ट’ केले आहे.  आरोपीची माहिती ८९७५७५७३०३, ७९७७७८१९२४ या मोबाईल नंबरवर देण्याचे आवाहन गुन्हे शाखा पोलिसांनी केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. 

डिजिटल चार्जशीट 
गुन्हेगार कायद्याच्या कचाट्यातून सुटू नयेत तसेच दोषसिद्धीचे प्रमाण वाढावे, यासाठी पोलिस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम्‌ यांनी डिजिटल चार्जशीट तयार करण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी नंदनवन पोलिसांनी प्रत्येक बयाण, पंचनामा, घटनास्थळाची पाहणी, पंचांचे बयाण, निरीक्षण आणि एफआयआर हे सर्व डिजिटल स्वरूपात केले. त्यामुळे आरोपी सुटण्याची शक्‍यता मावळली आहे.

ट्रकने पळाल्याची शक्यता
आरोपी विवेकने पाचही जणांचा खून केल्यानंतर दुचाकी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुचाकीची किल्ली न दिसल्याने तो पायीच निघाला. तो महामार्गापर्यंत ऑटो किंवा अन्य वाहनाने पोहोचला. तेथून ट्रकला हात दाखवून उत्तराखंड राज्याकडे गेल्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तवली. 

कोण देणार मायेची ऊब?
एखाद्या सामाजिक संस्थेने किंवा सामाजिक संघटनेने पुढाकार घेऊन मितालीला मायेची ऊब द्यावी.

भविष्याबद्दल चिंता
आरोपी विवेक पालटकर याची मुलगी मिताली (वय ९) हिच्यापासून नातेवाइकांनी दुरावा निर्माण केला आहे. वडिलाने केलेल्या पापांची शिक्षा मुलीला देण्याचा नातेवाइकांचा प्रयत्न दिसत आहे. त्यामुळे भावनेला तिलांजली दिल्याची चर्चा परिसरात आहे. मितालीला दोन सावत्र आत्या आहेत. सोमवारी दुपारपासूनच वैष्णवीला मायेचा ओलावा मिळत होता तर मितालीला दूर सारण्यात येत होते. पाच वर्षांची असताना आईचा मृत्यू झाला तर वडिलालासुद्धा जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा होणे निश्‍चित आहे. जवळचे नातेवाईक म्हणून कुणीच नसल्यामुळे मितालीचे भविष्य अंधकारमय असल्याचे स्पष्ट दिसत आहे. 

Web Title: Pawankar family murder case in nagpur