इच्छाशक्‍तीच्या बळावर गाठले शिखर

डॉ. संजय जैस्वाल
डॉ. संजय जैस्वाल

नागपूर : कठोर परिश्रम आणि प्रबळ इच्छाशक्‍ती असेल तर, कोणतेही काम अशक्‍य नाही, हे शहरातील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. संजय जैस्वाल यांनी सिद्ध करून दाखवून दिले. त्यांनी कोपनहेगन (डेन्मार्क) येथे नुकत्याच पार पडलेली आयर्नमॅन स्पर्धा पहिल्याच प्रयत्नात यशस्वीरित्या पूर्ण केली. 51 वर्षीय डॉ. जैस्वाल यांनी 3.8 किमी जलतरण, 180 किमी सायकलिंग आणि 42.2 किमी अंतराची पूर्ण आयर्नमॅन शर्यत 15 तास 23 मिनिटांत पूर्ण केली. याविषयी डॉ. जैस्वाल म्हणाले, मी आतापर्यंत तीनवेळा अर्ध आयर्नमॅन शर्यती पूर्ण केल्या होत्या. त्यामुळे पूर्ण आयर्नमॅन हे एकमेव माझे स्वप्न होते. ही कामगिरी अतिशय अवघड व आव्हानात्मक होती. शर्यतीदरम्यान अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. कडाक्‍याची थंडी, डोंगराळ भाग, अधूनमधून पडणारा पाऊस आणि समुद्रातील प्रचंड लाटा असूनही हार न मानता जिद्दीने केवळ प्रबळ इच्छाशक्‍तीच्या बळावर शर्यत पूर्ण केली. शर्यतीपूर्वी सात ते आठ महिने डॉ. अमित समर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली कठीण सराव केल्याचे त्यांनी सांगितले. तीन हजार स्पर्धकांचा सहभाग असलेली ही शर्यत 17 तासांच्या आत पूर्ण करावयाची होती. डॉ. जैस्वाल यांनी दीड तास अगोदरच पूर्ण केली. डॉ. जैस्वाल यांच्यापूर्वी डॉ. अमित समर्थ यांनी 2016 मध्ये ऑस्ट्रेलियात पूर्ण आयर्नमॅनचा किताब पटकाविला होता. डॉ. जैस्वाल यांनी त्यांच्या दोन मुलांसोबतही रिले अर्ध आयर्नमॅन पूर्ण केलेली आहे. पत्रकार परिषदेला डॉ. अमित समर्थ, राजेंद्र जैस्वाल, वैभव अंधारे व डॉ. अमित थत्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com