esakal | अचलपूर: मेळघाटातील मुलांसाठी बालरोगतज्ज्ञांच्या टिप्स
sakal

बोलून बातमी शोधा

अचलपूर: मेळघाटातील मुलांसाठी बालरोगतज्ज्ञांच्या टिप्स

अचलपूर: मेळघाटातील मुलांसाठी बालरोगतज्ज्ञांच्या टिप्स

sakal_logo
By
टीम ई सकाळ

अचलपूर: मेळघाटात पावसाळ्याच्या दिवसात विविध आजार डोके वर काढतात. याचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसतो. यावर उपाय म्हणून दरवर्षी आरोग्य विभागाच्या वतीने पंधरा पंधरा दिवसांसाठी बालरोगतज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येते. त्यामुळे यावर्षीसुद्धा पाच बालरोगतज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली होती.

हेही वाचा: पोलीसांचे वाहन नादुरुस्त; पेट्रोलिंग कशी करावी पोलिसांसमोर प्रश्न

या डॉक्टरांनी सर्व सॅम-मॅम बालकांची तपासणी करून उपकेंद्रांच्या डॉक्टरांना लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही टिप्स दिल्या. या टिप्स मेळघाटातील लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक ठरणार आहे.

सलोना आरोग्यकेंद्रात नियुक्त श्रीकांत जोशी यांनी आरोग्यकेंद्रांतर्गत येत असलेल्या सर्व सॅम-मॅम बालकांची तपासणी करून उपकेंद्राच्या डॉक्टरांना लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही टिप्स दिल्या. मेळघाटात पावसाळ्याच्या दिवसांत विविध प्रकारचे आजार डोके वर काढतात. यामुळे मोठ्या प्रमाणात बालमृत्यू व साथरोग पसरत असल्याने आदिवासी गर्भवती तसेच स्तनदा मातांसह शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना अतिदक्षतेखाली ठेवले जाते.

त्यांच्यावर उपचार करण्यासाठी स्त्रीरोग व बालरोग तज्ज्ञ डॉक्टरच नसल्याची ओरड पाहता पंधरा दिवसांसाठी धारणी व चिखलदरा तालुक्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांमध्ये बुलडाणा, यवतमाळ, वाशीम आदी जिल्ह्यांतून बालरोगतज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती केली जाते. त्याप्रमाणे 27 ऑगस्ट ते 10 सप्टेंबरपर्यंत अकोला येथील आरोग्य उपसंचालकांनी सलोना, बिजूधावडी, टेम्ब्रूसोंडा, कलमखार, साद्राबाडी या पाच प्राथमिक आरोग्यकेंद्रांत नियुक्ती केली होती.

पैकी सलोना आरोग्यकेंद्रात डॉ. श्रीकांत जोशी यांची नियुक्ती करण्यात आली होती. सदर डॉक्टरांनी आरोग्यकेंद्रांतर्गत येत असलेल्या सर्व उपकेंद्रांतील 0 ते 6 वयोगटातील सॅम-मॅम बालकांची तपासणी करून काही बालकांना संदर्भीत केले.

यादरम्यान मोथा उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता नागले, बिहाली येथील डॉ. गजानन खरपास, बोराळा येथील डॉ. विशाल दाभाडे या डॉक्टरांना लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही खास टिप्स दिल्या. दिलेल्या टिप्स मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने मोठ्या फायदेशीर ठरणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य पाटील यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

loading image
go to top