esakal | गणेशोत्सवात पोलीसांचे वाहन नादुरुस्त; पेट्रोलिंग कशी करावी पोलिसांना समोर प्रश्न
sakal

बोलून बातमी शोधा

पोलीसांचे वाहन नादुरुस्त; पेट्रोलिंग कशी करावी पोलिसांसमोर प्रश्न

पोलीसांचे वाहन नादुरुस्त; पेट्रोलिंग कशी करावी पोलिसांसमोर प्रश्न

sakal_logo
By
गजानन काळुसे

सिंदखेड राजा : सिंदखेड राजा तालुक्यातील किनगांव राजा पोलिसांचे वाहन गणेशोत्सवात नादुरुस्त पडल्यामुळे पेट्रोलिंग कशा पद्धतीने करावी असा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिला आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग वरील महत्वाचे पोलीस स्टेशन म्हणून किनगाव राजा पोलीस स्टेशनची ओळख आहे पोलिसांना नेहमी पेट्रोलिंग साठी शासकीय वाहनांचा वापर करावा लागतो.

हेही वाचा: अर्ध्यावरच प्रेमाचा संसार मोडून गेली, डेंगीने घेतला बळी

परंतु अनेक दिवसापासून शासकीय वाहन जुने असल्यामुळे असल्यामुळे कोणत्या वेळी नादुरुस्त होत असल्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सुद्धा उपस्थित झाला आहे? पोलिसांच्या आयुष्यात बदल घडण्यासाठी आधुनिक पोलिसिंग,पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेणारे विविध उपक्रम पोलीस विभागाकडून राबवल्या जाते.

परंतु सद्या पोलीस अधिकारी व कर्मचारी शासकीय जुने वाहनामुळे वैतागून गेलेले पाहायला मिळतात.किनगांव राजा पोलीस स्टेशला मिळालेले शासकीय वाहन क्रमांक एम एच २८ सी.६४६१ हे तारीख १२ सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशन मधुन वाहन पेट्रोलिंग साठी मार्गस्थ झाले होते, सदर वाहन हे बस स्थानकाच्या जवळ आल्यानंतर नादुरुस्त झाले.

त्यामुळे चालकांने वाहन रस्त्याच्या बाजुला उभे केले. चालकांने वाहनांची पहाणी केल्यानंतर वाहनाच्या समोरील दोन चाकामधील असलेले बॉल जॉईंट तुटल्याचे लक्षात आले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. सद्या गणेश उत्सवाचे दिवस असल्यामुळे पोलीस विभागाकडून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पेट्रोलिंग करण्याचे काम सुरू आहे सुदैवाने वाहन धावत असतांना अचानक पणे शासकीय वाहन नादुरुस्त झाले असते तर मोठा अनर्थ घडला असता. वाहनांची अडचण पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या वेळीच लक्षात आल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.

"यापूर्वी पोलीस स्टेशनच्या शासकीय वाहनांचा अपघात झाला होता. काही महिन्यांअगोदर तत्कालीन ठाणेदार व चार ते पाच कर्मचारी पेट्रोलिंग करण्यासाठी पोलीस स्टेशनच्या शासकीय वाहनातून जात असताना अचानक पणे गाडीचे स्टेरिंग जाम झाल्यामुळे सोनशी ते वर्दडी मार्गावर रस्त्याच्या बाजूला असलेल्या आठ ते दहा फूट खड्ड्यामध्ये शासकीय वाहन पलटी झाले होते, त्यामध्ये तत्कालीन ठाणेदार व चार ते पाच पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले होते, त्यानंतर पोलीस विभागाच्या वरिष्ठांकडून पोलीस स्टेशनला जुनेच वाहने देण्यात आले होते ते सुद्धा नादुरुस्त होत असल्यामुळे नवीन वाहन किनगाव राजा पोलीस स्टेशनला देण्याची मागणी होत आहे."

loading image
go to top