पेंचमधील ऑनलाइन बुकिंग रद्द

पेंचमधील ऑनलाइन बुकिंग रद्द

नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पात पावसाळ्यानंतर 15 ते 31 ऑक्‍टोबररर्यंत निसर्ग पर्यटनाचा बेत आखलेल्या 600 पर्यटकांचे ऑनलाइन बुकिंग रस्ते नादुरुस्त असल्याने रद्द केले आहे. त्याता फटका पर्यटकांना बसल्याने अनेकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. त्यातील सर्वाधिक बुकिंग हे 26 ते 28 या सुटीच्या काळातील असून ते खुर्सापार प्रवेशद्वाराचे असल्याची माहिती पुढे आली आहे. 
खुर्सापार प्रवेशद्वारातून निसर्गपर्यटनाला गेल्यास हमखास वाघाचे दर्शन होत असल्याने पर्यटकांच्या या गेटवर अधिक गर्दी असते. गेल्यावर्षीच्या मोसमात खुर्सापार गेटमुळे वन विभागाला 1 कोटी 45 लाख महसूल मिळाला होता. यंदाच्या मोसमातही वाघाचे दर्शन होईल यामुळे पर्यटन सुरू होताच पर्यटकांनी या गेटवर बुकिंगसाठी गर्दी केली होती. त्यासाठी त्यांनी महाऑनलाइन या वेबसाईटवर बुकिंग केले होते. ते बुकिंग रद्द झाल्याने पैसे परत मिळणार असले तरी रिसोर्टला दिलेले पैसे परत मिळणार नसल्याने अनेक पर्यटकांचे आर्थिक नुकसान होणार आहे. खुर्सापार गेटवर 16 ते 31 ऑक्‍टोबर या कालावधीत 98 गाड्यांचे बुकिंग होते. त्यात प्रत्येकी चार पर्यटकानुसार चारशे पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. याशिवाय सिल्लारी, चोरबाहुली, सुरेवाणी, पवनी आणि खुबाळा गेटवरीलही प्रवेश रद्द झाल्याने सहाशे ते साडेसहाशे पर्यटकांना ऑनलाइन बुकिंग रद्द झाल्याचा फटका बसला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com