पेंचच्या सर्व उपसासिंचन योजना कार्यान्वित करणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

नागपूर - मध्यप्रदेशातील चौराई धरणामुळे महाराष्ट्रातील पेंच प्रकल्पाच्या पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात झालेली घट लक्षात घेता व पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाने १०१५ कोटी रुपयांच्या तीन भागात करण्यात येणाऱ्या दुष्काळ नियोजन कार्यक्रमाला प्रशासकीय मान्यता दिली. 

नागपूर - मध्यप्रदेशातील चौराई धरणामुळे महाराष्ट्रातील पेंच प्रकल्पाच्या पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात झालेली घट लक्षात घेता व पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाने १०१५ कोटी रुपयांच्या तीन भागात करण्यात येणाऱ्या दुष्काळ नियोजन कार्यक्रमाला प्रशासकीय मान्यता दिली. 

पेंच जलसिंचन प्रकल्पासंदर्भात उद्‌भवलेल्या गंभीर पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कमी कालावधीत व दीर्घ कालावधीत पूर्ण होऊ शकणाऱ्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांची त्वरित अमलबजावणी व्हावी याकरिता पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार जलसंपदा विभाग, कृषी, जलसंधारण, महानगर पालिका, एनटीपीसी, वेकोलि, महाजेनको आदी यंत्रणाच्या समन्वयाने या उपाययोजना करण्यात येणार आहेत.

पेंच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात प्रस्तावित असलेल्या सर्व उपसा सिंचन योजनेखालील १४ हजार १० हेक्‍टर क्षेत्रावरील वितरण प्रणालीला सूक्ष्म सिंचनाखाली आणली जाणार आहे. बाबदेव साखर कारखान्याच्या अस्तित्वात असलेल्या बंधाऱ्यावरून मौदा शाखा कालव्यात पाणी वापरणे २१६० क्षेत्र पुनर्स्थापित केले जाईल. सांड नाल्यावर निमखेडा गावाजवळ तसेच चाचेर व बेलडोंगरीच्याखाली नवीन बंधारा, वेस्टर्न कोलफिल्डमधील खदानींमध्ये असलेल्या पाण्याचा वापर, इंदर पाणी कामठी खदानीतील पाण्याचा वापर, वेकोलिच्या गोंडेगाव खदानीतील पाण्याच्या वापरात १२०० हेक्‍टर क्षेत्र पुनर्स्थापित केले जाणार आहे.

हजारो हेक्‍टर क्षेत्राची पुर्नस्थापना
सूर नदीवर अरोली गावाजवळ तसेच खंडाळा गावाजवळ नवीन बंधारा बांधला जाईल. सूर नदीवर भोसा खमारी तसेच कोंदामेंढी इंदोरा गावाजवळ नवीन बंधारा,  कन्हान नदीवर माथनी येथील जुन्या पुलाला ब्रिज कम बंधारा, कन्हान नदीतील पाणी पेंच उजव्या कालव्याच्या जलसेतूजवळ बंधारा, सिहोरा येथे एल-४ शाखा कालव्याच्या किमी २ जवळ कन्हान नदीवर बंधारा बांधून एकूण २६ हजार ३७० हेक्‍टर क्षेत्र पुनर्स्थापित केले जाणार आहे.

Web Title: pench project water storage