esakal | स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकडे अनेकांच्या नजरा; इच्छुकांची होऊ लागली भाऊगर्दी

बोलून बातमी शोधा

{"A?":"B","a":5,"d":"B","h":"www.canva.com","c":"DAERspJsD6g","i":"ZrGdgpLMmQdrSXyw0lSx8Q","b":1614247115035,"A":[{"A?":"I","A":101.69700859073133,"B":691.8907403604896,"D":182.88175605588742,"C":56.19457595171813,"a":{"B":{"A":{"A":"MAEWe89Px04","B":1},"}

राजकारणातील पहिली पायरी म्हणून पालिकेचा सदस्य, वॉर्डाचा कारभारी होण्याचे अनेकांना डोहाळे लागले आहे. अनेक जणांनी डोक्‍याला बाशिंग बांधून तयारी सुरू केली आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकडे अनेकांच्या नजरा; इच्छुकांची होऊ लागली भाऊगर्दी
sakal_logo
By
मोहन सुरकार

सिंदी (रेल्वे) (जि. वर्धा) : धावपळ करणाऱ्या कर्ताधर्त्याला लोक विचारू लागतात. छोट्या-मोठ्या कामांसाठी शहरातील नागरिक पाचारण करतात. आणि येथूनच नेतेगिरीची भावना वाढीस लागते. त्यालाही वाटायला लागते की आपणही राजकारणात नशीब अजमावायचे. पुढील आठ महिन्यांनी सिंदी पालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. परिणामतः राजकारणातील पहिली पायरी म्हणून पालिकेचा सदस्य, वॉर्डाचा कारभारी होण्याचे अनेकांना डोहाळे लागले आहे. अनेक जणांनी डोक्‍याला बाशिंग बांधून तयारी सुरू केली आहे. 

हेही वाचा - पोलिसांना जंगलात दिसले भांडे, भाजीपाला, राशन; आत...

वास्तविक पाहता यंदाची पालिकेची पंचवार्षिक या ना त्या कारणाने नेहमी चर्चेचा विषय बनलेली होती. राज्य शासनाच्या नवीन नियमानुसार आता नगराध्यक्षपद संपूर्ण शहरातून लोकनियुक्तपद्धतीने निवडल्या जाणार नसून निवडून आलेल्या नगरसेकातून निवडल्या जाणार आहे. यामुळे निवडून येणाऱ्या सदस्यांची चांदी राहणार असल्याने अनेकांनी ही निवडणूक लढविण्यासाठी कंबर कसली आहे. 

शिवाय प्रभागपद्धती बंद करून वॉर्डपद्धती अंमलात आल्याने मतदारांची संख्या आणि विजयी होण्यासाठी लागणाऱ्या मतांची संख्या कमी झाल्याने अनेकांना निवडणुकीचे स्वप्न पडू लागले आहे. त्या अनुषंगाने निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांनी भेटीगाठी आणि या इंटरनेटच्या काळात व्हॉट्‌सऍप आणि फेसबुक सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून गुड नाईट आणि गुड मॉर्निंगचे मॅसेज आवर्जून पाठवणे सुरू केले आहे. 

नक्की वाचा - गडचिरोलीतील एटापल्लीत मोठा अनर्थ टळला; नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेले भूसुरुंग पोलिसांनी केले नष्ट  

यात काही इच्छाधारी आतापर्यंत अडगळीत पडलेला एखादी लोकहिताचा विकासाचा मुद्दा उकरून काढत आहे. तो पूर्ण किंवा निकाली काढण्यासाठी आपण एकदम सक्षम असून तुमची साथ मिळाली तर हे काम "मी" पूर्ण करणार अशी बतावणी करीत नागरिकांचे मन वळविण्याचा प्रयत्न करीत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ