esakal | 'नो मास्क, नो पास' तरीही बिनधास्त; कारवाई करणाऱ्या पोलिसांशी रस्त्यावरच वाद

बोलून बातमी शोधा

amaravati }

शहरातील इर्विन चौक, राजकमल, जयस्तंभ,कठोरा नाका, पंचवटी चौक, राजापेठ, बडनेरा मार्ग व नागपुरीगेट परिसरात मोठ्या प्रमाणावर सकाळपासून पोलिसांचे तपासणी नाके लावलेले आहेत. आवश्‍यकता नसताना घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने वारंवार केले जाते.

'नो मास्क, नो पास' तरीही बिनधास्त; कारवाई करणाऱ्या पोलिसांशी रस्त्यावरच वाद
sakal_logo
By
संतोष ताकपिरे

अमरावती ः राज्यामध्ये कोविड-19 चा सर्वाधिक प्रादुर्भाव मुंबईनंतर अमरावती जिल्ह्यात आहे. संचारबंदी काळात रस्त्यावर वाहनाने फिरताना अधिकृत पास नाही किंवा चेहऱ्याला मास्क न बांधता बरेच जण बिनधास्त वावरत असल्याचे चित्र सर्वत्र बघायला मिळत आहे.

शहरातील इर्विन चौक, राजकमल, जयस्तंभ,कठोरा नाका, पंचवटी चौक, राजापेठ, बडनेरा मार्ग व नागपुरीगेट परिसरात मोठ्या प्रमाणावर सकाळपासून पोलिसांचे तपासणी नाके लावलेले आहेत. आवश्‍यकता नसताना घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने वारंवार केले जाते. तरीही अशी मंडळी बिनधास्त फिरताना शहरात सापडतात. पोलिस किंवा महापालिकेच्या पथकाने मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केल्यास कारवाई करणाऱ्यांशीच सुशिक्षित वर्ग मोठ्या प्रमाणात हुज्जत घालताना दिसतात. 

'भ्रष्टाचार हा तर सिस्टमचा भाग'; राज्याच्या पोलिस महासंचालकांचं धक्कादायक...

फ्रेजरपुरा पोलिसांनी अशा 13 ठिकाणी कारवाई केली. बडनेरा 4, नांदगावपेठ 2, गाडगेनगर 18, नागपुरीगेट 6, राजापेठ 5, शहर कोतवाली 8, खोलापुरीगेट 4, भातकुली 2, नांदगावपेठ 2 यांसह इतर ठिकाणी पोलिसांनी कारवाई आहे. पोलिसांप्रमाणेच महापालिका प्रशासनाचे पथकही रस्त्यावर कारवाईसाठी उतरले. त्यांनाही पोलिसांसारखाच मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.

१०० कोटींची घरे आणि ६० कोटींचे रस्ते; नागपूर सुधार...

सीपी, डीसीपींची दिवस-रात्र गस्त

शहरात महत्त्वाच्या ठिकाणी फिक्‍स पॉइंट लावलेले आहेत. पोलिसांच्या मदतीला होमगार्डसह एसआरपीएफ जवानांचे पथकही गुरुवारी (ता. 25) अनेक ठिकाणी तपासणी करताना आढळले. संचारबंदी काळात सुरू असलेल्या गस्तीत ढिसाळपणा आढळून येऊ नये म्हणून सीपींसह डीसीपी दिवस-रात्र फिक्‍स पॉइंटच्या ठिकाणी भेटी देत आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ