esakal | ग्रामीण भागात फ्रंटलाइन वर्कर्सना विरोध; सहकार्य न केल्यास जिल्हा परिषदेचा कारवाईचा इशारा

बोलून बातमी शोधा

ग्रामीण भागात फ्रंटलाइन वर्कर्सना विरोध; सहकार्य न केल्यास जिल्हा परिषदेचा कारवाईचा इशारा
ग्रामीण भागात फ्रंटलाइन वर्कर्सना विरोध; सहकार्य न केल्यास जिल्हा परिषदेचा कारवाईचा इशारा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य कर्मचारी (Health workers) व इतर कर्मचारी ग्रामीण भागात कोरोना टेस्टिंग (Corona testing), लसीकरण (Vaccination), बाधिताला रुग्णालय, कोविड केअर सेंटरमध्ये (Covid Care Center) भरती करण्यासाठी कर्तव्य करतात. मात्र, ग्रामपंचायतमधील लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक सहकार्य न करता विरोध करतात. त्यामुळे शासकीय कामकाजात अडथळा निर्माण होत आहे. आता, विरोध होण्याचे प्रकार आढळल्यास थेट कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे (Yavatmal ZP) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिला आहे.(People are not supporting front line workers in Yavatmal district)

हेही वाचा: कौतुकास्पद! कोरोनाग्रस्तांसाठी तरुण बनला देवदूत; स्वतःच्या गाडीला रुग्णवाहिका बनवून दिवसरात्र सेवा

शहरी भागासोबतच दुसऱ्या लाटेचा ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. जिल्ह्यात कोविडचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. काही ग्रामीण भागातील यंत्रणा, ग्रामस्थ, प्रतिष्ठित नागरिक प्रशासनाला सहकार्य करीत आहे. वेळेवर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे, जीवनावश्‍यक वस्तूंचा घरपोच पुरवठा करण्यासाठी समिती स्थापन करून पोहचविणे, आदी कार्य करून प्रशासनाला सहकार्य करीत आहे. मात्र, काही गावांत उलट चित्र आहे. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आदी फ्रंटलाइन वर्करला विरोधाचा सामना करावा लागत आहे.

मागील वर्षभरापासून यंत्रणा अहोरात्र काम करीत आहे. मात्र, विरोध होत असल्याने कर्मचाऱ्यांचा हिरमोड होऊन मानसिक खच्चीकरण होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव जगासह देशाने अनुभवला आहे. आरोग्य सेवा आणि रुग्ण व्यवस्थापन किती महत्त्वाचे आहे. याची जाणीव स्थानिकांना करून देण्याचे निर्देश गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. ग्रामस्तरीय समितीकडूनही सहकार्याची अपेक्षा करण्यात आली आहे.

हेही वाचा: बापरे! एकाच एकाच रात्रीत तब्बल ४ घरफोडी; अमरावतीत चोरट्यांचा प्रचंड धुमाकूळ

आरोग्य कर्मचारी, शासकीय यंत्रणेस प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना विरोध होत असल्यास ग्रामस्तरीय समिती, सरपंच, सदस्य, लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिकांवर तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश बीडीओ, टीएचओंना देण्यात आले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियमनुसार करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे.

(People are not supporting front line workers in Yavatmal district)