esakal | बापरे! एकाच एकाच रात्रीत तब्बल ४ घरफोडी; अमरावतीत चोरट्यांचा प्रचंड धुमाकूळ

बोलून बातमी शोधा

बापरे! एकाच एकाच रात्रीत तब्बल ४ घरफोडी; अमरावतीत चोरट्यांचा प्रचंड धुमाकूळ
बापरे! एकाच एकाच रात्रीत तब्बल ४ घरफोडी; अमरावतीत चोरट्यांचा प्रचंड धुमाकूळ
sakal_logo
By
संतोष ताकपिरे

अमरावती ः वलगाव ठाण्याच्या (Walgaon police station) हद्दीत नया अकोला परिसरात एकाच रात्रीतून चार घरांना चोरांनी (Thieves) लक्ष्य केले. त्यापैकी एका घरामधून 72 हजार रुपयांची रोकड लंपास (Stealing money) केली. सोमवारी (ता. तीन) सकाळी या घटना उघडकीस आल्या. (Theft in 4 houses at a night in Amravati)

हेही वाचा: कौतुकास्पद! कोरोनाग्रस्तांसाठी तरुण बनला देवदूत; स्वतःच्या गाडीला रुग्णवाहिका बनवून दिवसरात्र सेवा

विनोद पुंजाराम चव्हाण हे अमरावतीत राहत असून, त्यांचे एकघर नया अकोला येथे आहे. त्यांच्या शेजारी अन्य काही घरे आहेत. दोन वर्षांपासून श्री. चव्हाण यांचे घर बंद होते. चोरट्यांनी त्यांच्या घराचे दार तोडून आत धुमाकूळ घातला. 72 हजार रुपयांची रोख रक्कम चोरीस गेल्याची तक्रार श्री. चव्हाण यांनी वलगाव ठाण्यात नोंदविली.

चोरट्यांनी श्री. चव्हाण यांच्या घराशेजारी राहत असलेल्या भीमराव सपाटे, माया खडसे व रत्ना तिडके यांच्याही घरात प्रवेश केला. परंतु येथून काहीही चोरीस गेले नसल्याची बाब चौकशीतून पुढे आली. एकाच रात्रीतून चार घरांना लक्ष्य केल्याने चोरट्यांच्या शोधासाठी श्‍वानपथक, ठसेतज्ज्ञांना नया अकोला येथील घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते.

हेही वाचा: Breaking: माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची हायकोर्टात धाव; CBI नं दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी याचिका

पोलिसांचे श्‍वान घटनास्थळी काही दूर अंतरावर जाऊन थांबले. अखेर अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दोन वर्षांपासून बंद असलेल्या घरातून 72 हजारांची रोख रक्कम चोरीस गेल्याची तक्रार नोंदविली. त्यात वलगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

(Theft in 4 houses at a night in Amravati)