आपण विसरतोय पण 'त्यांना' आहे आठवण; परप्रांतीय जपताहेत दिवाळीतील किल्ल्यांची परंपरा  

विवेक राऊत 
Saturday, 21 November 2020

आपल्या महाराष्ट्रातील किल्ले, गड या साऱ्यांना फार प्राचीन काळापासून अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये किल्ले बनवण्याची परंपरा ही आपल्या पूर्वजांनी आपला गौरवशाली इतिहास लहान मुलांनी अभ्यासावा याकरता निर्माण केलेली एक संधी आहे. तालुक्‍यातील चांदूरवाडी जवळ जडीबुटी विक्रेते परप्रांतीय यांची वसाहत आहे. 

चांदुर रेल्वे (जि. अमरावती) ः दिवाळीच्या सुट्टीत घराच्या आवारात महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांची प्रतिकृती उभारण्याच्या जुन्या परंपरेकडे सध्याच्या "स्मार्टफोन' युगात ओढ कमी झाली आहे. मात्र तालुक्‍यात वसलेले परप्रांतीय मात्र अजूनही किल्यांची परंपरा जपतांना दिसत आहे.

आपल्या महाराष्ट्रातील किल्ले, गड या साऱ्यांना फार प्राचीन काळापासून अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये किल्ले बनवण्याची परंपरा ही आपल्या पूर्वजांनी आपला गौरवशाली इतिहास लहान मुलांनी अभ्यासावा याकरता निर्माण केलेली एक संधी आहे. तालुक्‍यातील चांदूरवाडी जवळ जडीबुटी विक्रेते परप्रांतीय यांची वसाहत आहे. 

क्लिक करा - रात्र वैऱ्यांची! धानपिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांसह गावकऱ्यांचे ‘जागते रहो

त्यांच्या प्रत्येक झोपडीपुढे एक किल्ला पाहायला मिळते, परिसरातील लहान व मोठे मुले या किल्ला बनविण्याचे नियोजन दिवाळीपूर्वीच करतात, त्यासाठी ते आपल्या प्रांतातून शिवाजी महाराज व त्यांच्या सेनापती, सैन्य यांच्या मुर्त्या बोलावीत त्यांची सुंदर मांडणी ते किल्ल्यावर करतात. त्या भोवताल त्यांचे विविध खेळ हे लहान मुले खेळतात, 

या खेळासोबत त्यांना विविध राजे महाराजे यांचा गौरवशाली इतिहास सांगितल्या जात असल्याची माहिती अजय ठाकूर यांनी दिली. 10 ते 20 वर्षांपूर्वी विदर्भात अनेक ठिकाणी दिवाळीत अंगणात किल्ले पाहायला मिळाचे. घरी आलेले सर्व पाहुणे मंडळी, त्यातील बच्चे कंपनी मोठ्यांच्या मार्गदर्शनात शेण, माती, विटा, दगड यांच्यापासून किल्ले तयार करत असे. 

सविस्तर वाचा - दुर्दैवी! फराळाचे पदार्थ करताना अचानक घरात पसरला धूर आणि क्षणाधार्त संसाराची झाली राखरांगोळी

दोन तीन दिवस त्यांचा खेळ चालत असे. आज स्मार्टफोनच्या काळात अनेक मुलांचा माती गोट्यांशी संबंध तुटला असून ते मोबाईलवरच किल्ले लढवतांना दिसत आहेत. पण अशातही आपली परंपरा जपत आपल्या मुलाबाळांना किल्ले, थोर पुरुष, राजे महाराजे, यांचा इतिहास व महत्व सांगत हे परप्रांतीय पुढच्या पिढीकडे परंपरेचा वारसा देत असल्याचे पाहायला मिळत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: people out of state are making castles in diwali