esakal | "भीमराया घे तुझ्या लेकरांची वंदना..."; अनुयायांकडून महामानवाला अभिवादन 
sakal

बोलून बातमी शोधा

people pay tributes to doctor Babasaheb Ambedkar on Mahaparinirwan day

दरवर्षी प्रमाणे इर्विन चौकात असलेली गर्दी यंदा दिसून आली नाही. मात्र अनुयायांमधील उत्साह कायम होता. सकाळपासूनच पुतळा परिसरात नागरिकांनी अभिवादन करण्यासाठी वर्दळ सुरू झाली.

"भीमराया घे तुझ्या लेकरांची वंदना..."; अनुयायांकडून महामानवाला अभिवादन 

sakal_logo
By
सुधीर भारती

अमरावती : फुले तसेच आकर्षक रोषणाईने सजविलेला परिसर, रांगेत शिस्तीने महामानवाला अभिवादन करण्यासाठी जमलेले आबालवृद्ध, महिला व पुरुष असे चित्र रविवारी (ता.6) स्थानिक इर्विन चौकात दिसून आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या असंख्य अनुयायांनी अभिवादन केले. कोरोनाची परिस्थिती पाहता कुठेही गर्दी दिसली नाही. विशेष म्हणजे नियमांचे पालन करून नागरिकांनी भीमरायाला अभिवादन केले.

दरवर्षी प्रमाणे इर्विन चौकात असलेली गर्दी यंदा दिसून आली नाही. मात्र अनुयायांमधील उत्साह कायम होता. सकाळपासूनच पुतळा परिसरात नागरिकांनी अभिवादन करण्यासाठी वर्दळ सुरू झाली. संपूर्ण पुतळा परिसराला हार फुलांनी सजविण्यात आले होते. सकाळी पालकमंत्री यशोमती ठाकूर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष हिम्मत ढोले, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी बाबासाहेबांना आदरांजली वाहिली.    

जाणून घ्या - डॉ. शीतल आमटे- करजगी यांचं शेवटचं चॅटिंग कुणाशी? पासवर्ड स्वतःचे डोळे ठेवल्यानं वाढल्या अडचणी

पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर, महापालिकेते विरोधी पक्षनेता बबलू शेखावत, किशोर बोरकर, अशोक दहीकर, ऍड. दिलीप एडतकर, रामभाऊ पाटील, विलास इंगोले, हरिभाऊ मोहोड, रामेश्‍वर अभ्यंकर, प्रफुल्ल गवई, राजकुमार मुन, कमलताई कांबळे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.     

संविधानाचे पावित्र्य जपण्याचा निर्धार करू या

स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मानवतेची महानमूल्ये संविधानाने प्रत्येक भारतीयाला दिली आहे. संविधानाच्या या चौकटीला धक्का लावण्याचा प्रयत्न कुणी करू नये. संविधानाचे पावित्र्य जपण्याचा निर्धार प्रत्येक भारतीयाने केला पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी यावेळी केले.  

धर्म, आत्मचरित्राचा खजिना

पुतळ्याच्या परिसरात भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित पुस्तके, ग्रंथांची तसेच प्रतिमेची दुकाने सजविण्यात आली होती. 

वाहतूक सुरळीत

दरवर्षी अनुयायांची होणारी गर्दी पाहता इर्विन चौकातील वाहतूक व्यवस्था वळविण्यात येते. मात्र यंदा कोरोनामुळे अनुयायांनी गर्दी न केल्याने या परिसरातील वाहतूक पूर्ववत सुरू होती. 

अधिक माहितीसाठी - विजय वडेट्टीवार यांच ‘एक तीर दो निशान’; उदयनराजेंच्या निमित्ताने फडणवीसांना हाणला टोला

"भीमप्रकाश'ची रक्तदानाने आदरांजली

सध्या कोविडमुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून रक्ताची उणीव भरून काढण्यासाठी विलासनगर येथील भीमप्रकाश युवक मंडळाच्या 40 कार्यकर्त्यांनी रक्तदान करून बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. माजी नगरसेवक  प्रा. प्रदीप दंदे यांनी रक्तदानाचे आवाहन केले होते. यावेळी प्रदीप दंदे, डॉ. अशोक पळवेकर, डॉ. वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image