कोरोना काळातही शासकीय कार्यालयात माणसांची जत्रा, यांना अटकाव घालणार कोण?

people violate social distancing rules even in corona time in amravati
people violate social distancing rules even in corona time in amravati

अमरावती : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात जत्रा, यात्रा, मेळाव्यांवर बंदी घातली असली तरी शासकीय कार्यालयातील अप्रत्यक्षपणे भरणाऱ्या माणसांच्या जत्रांवर मात्र कुणाचेच नियंत्रण नसल्याचे चित्र सध्या शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये पाहायला मिळत आहे.  

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कुठेही गर्दी होता कामा नये, असे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश आहेत. मात्र, जिल्हाकचेरीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कामगार उपायुक्त कार्यालयात दररोज माणसांची जत्रा भरत आहे. शासकीय कार्यालयांतील ही गर्दी कुणाच्याही नजरेत का भरत नाही?, असा प्रश्‍न आता विचारला जात आहे. अन्य शासकीय कार्यालयांमध्येसुद्धा हाच प्रकार कमी अधिक फरकाने दिसून येत आहे. यानिमित्ताने सोशल डिस्टन्सिंगचा पार फज्जा उडाल्याचे चित्र दिसून येत आहे.  

राज्यातील असंगठित क्षेत्रात कार्यरत घर कामगारांसाठी शासनाकडून विविध योजना आखण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने नोंदणी करण्यासाठी कामगार उपायुक्त कार्यालयात दररोज हजारोंची गर्दी जमत आहे. पुरुष तसेच महिलांच्या स्वतंत्र रांगा असल्या तरी सोशल डिस्टन्सिंग नावालाही कुठे उरले नाही. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढलेला असून प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. गर्दी जमविण्यासाठी कारणीभूत सर्व बाबींना अटकाव करण्यात आला आहे. मात्र, तरीसुद्धा शासकीय योजनांचा लाभ घेण्याच्या उद्देशाने नागरिक सर्व प्रयत्नांना हरताळ फासत आहेत. 

कोरोनावर नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व जत्रा, यात्रा, मेळावे रद्द कल आहेत. मात्र, दुसरीकडे शासकीय कार्यालयांमध्ये अशा पद्धतीने भरत असलेल्या अप्रत्यक्ष जत्रांना कोण अटकाव करणार?, असा प्रश्‍न आता चर्चिला जात आहे.  

सर्व्हर डाउन -
शहरात असलेल्या तहसील, कामगार कल्याण, सेतूकेंद्र, भूमीअभिलेख, नोंदणी कार्यालय तसेच अन्य कार्यालयांमध्ये सध्या गर्दी वाढत असली तरी त्यामागे सर्व्हर डाउन असणे हे मोठे कारण मानले जात आहे. तासन्‌ तास सर्व्हर डाउन राहत असल्यामुळे बहुतांश नागरिक दुसऱ्या दिवशी येण्याऐवजी त्याचठिकाणी ताटकळत राहतात. त्यामुळे सोशल डिस्डन्सिंगचा फज्जा उडालेला दिसून येत असल्याचे दिसून येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com