अकोला: महावितरणच्या वसुली पथकावर हल्ला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

सहा हजार रुपयांचे होते देयक प्रलंबित
नासीरोद्दीन कादीरोद्दीन याच्याकडे महावितरणचे सहा हजार १९० रुपये देयक प्रलंबित होते. हे देयक त्यांना १४ मार्चपुर्वी'भरणे आवश्‍यक होते. परंतु, त्याने ते भरले नसल्याने महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांनी देयक भरण्याच्या यापुर्वी'सूचना केल्या होत्या. परंतु, त्याकडे नासीरोद्दीन याने दुर्लक्ष केले. परिणामी, महावितरणच्या वसुली पथकाकडून कारवाई'करण्यात येत असताना नसीरोद्दीन याच्यासह इतरांनी त्यामध्ये अडथळा आणला.

अकोला : महावितरण कंपनीच्या वसुली पथकावर ग्राहकाने हल्ला करून सहायक अभियंत्यासह जखमी केल्याची घटना बुधवारी दुपारी दोन वाजता जुने शहरातील अगरवेसमधील सारा अपार्टमेंट येथे घडली. याप्रकरणी डाबकी रोड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा हजार १९० रुपये होते देयक प्रलंबित होते.

महावितरणचे सहायक अभियंता अमोल दत्तात्रय लकडे (३०, रा. गाेरक्षण रोड) हे पथकासह अजहर नसरूद्दीन याच्या घरी महावितरणचे देयक थकलेले असल्याने वसुलीसाठी गेले. तिथे अजहर नसरूद्दीन, फैजान नसरूद्दीन, मो. इबराल अधिक तीन ते चार जणांनी पथकाशी शिवीगाळ करून त्यांना जिवे मारण्याची धमकी देत मारहाण करून शासकीय कामात अडथळा घातला. या प्रकरणी अमोल लकडे यांच्या फिर्यादीवरून डाबकी रोड पोलिसांनी गैर कायदेशिर मंडळी जमवून शासकीय कामात अडथळा करणे, अश्‍लिल शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देणे व मारहाण करणे यावरून गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून अद्यापपर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नाही आहे. दरम्यान, शासकीय कर्मचाऱ्यांवर अशाप्रकारे होत असलेल्या हल्ल्यांच्या घटनांनंतर पोलिसांनी संबंधितांवर तत्काळ कारवाई करून त्यांना लगेच जेरबंद करणे आवश्‍यक आहे.

सहा हजार रुपयांचे होते देयक प्रलंबित
नासीरोद्दीन कादीरोद्दीन याच्याकडे महावितरणचे सहा हजार १९० रुपये देयक प्रलंबित होते. हे देयक त्यांना १४ मार्चपुर्वी'भरणे आवश्‍यक होते. परंतु, त्याने ते भरले नसल्याने महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांनी देयक भरण्याच्या यापुर्वी'सूचना केल्या होत्या. परंतु, त्याकडे नासीरोद्दीन याने दुर्लक्ष केले. परिणामी, महावितरणच्या वसुली पथकाकडून कारवाई'करण्यात येत असताना नसीरोद्दीन याच्यासह इतरांनी त्यामध्ये अडथळा आणला.

मारहाणीचा व्हीडीओ व्हायरल
दरम्यान, अजहर नसरूद्दीन याच्यासह इतरांकडून सहायक अभियंता लकडे व पथकातील सहकाऱ्यांना मारहाण झाल्याच्या घटनेचे चित्रीकरण मोबाईलमध्ये करण्यात आले आहे. हे चित्रीकरण आता सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

Web Title: peoples attacked Mahavitran employees in Akola