भूकंप झाल्यासारखा येतो मोठा आवाज, जीव मुठीत घेऊन नागरिक पडतात घराबाहेर

सायराबानो अहमद
Monday, 11 January 2021

अत्यल्प उत्पादन होत असल्याने परिसरातील शेतकरी खाणींना वैतागले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून डब्बर, गिट्टी व मुरूम अशा गौण खनिजाचा खनिपट्टा परवाना आदेश देताना 62 अटी व शर्तींचे पालन करणे बंधनकारक आहे.

धामणगावरेल्वे ( जि. अमरावती ) : तालुक्‍यातील अंजनसिंगी, धामणगाव, बाभूळगाव या रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी शासनाने परवानगी दिलेल्या खासगी खाणींवर अटी व शर्ती काटेकोरपणे पाळल्या जात नसल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. मशिनरीमध्ये जसे दगड घालून त्याची बारीक गिट्टी आणि चुरा केला जातो, अक्षरश: त्याच पद्धतीने नियमांचा खाणींच्या ठिकाणी चुरा केला जात आहे. याकडे शासन व प्रशासकीय यंत्रणा खाणींकडे ढुंकूनही पाहत नसल्याची माहिती आहे. 

हेही वाचा - वाघ मालकाला नेत होता ओढत, पण कुत्र्यानं केलेलं कृत्य पाहून मृत्यूच्या दारात असलेला मालकही झाला...

ज्याठिकाणी खाणी आहेत, त्या शेजारील शेतजमिनींची तर वाटच लागली आहे. दरम्यान, खाणीच्या सुरुंग स्फोटांनी गावातील घरांना भूकंपासारखे धक्‍के बसत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. बारीक धुळीचा थर साचून शेतजमिनी नापिक बनल्या आहेत. अत्यल्प उत्पादन होत असल्याने परिसरातील शेतकरी खाणींना वैतागले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून डब्बर, गिट्टी व मुरूम अशा गौण खनिजाचा खनिपट्टा परवाना आदेश देताना 62 अटी व शर्तींचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र, या अटी आणि शर्ती खनिपट्टाधारकांकडून पायदळी तुडविल्या जात असल्याचे दिसून येत आहे. सर्व नियमावलीच्या दृष्टीने काही खाणींची पाहणी केली असता एकाही ठिकाणी बारकाईने नियम पाळले जात नसल्याचे आढळून आले. जे क्षेत्र खाण आणि मशिनरीसाठी निवडले आहे, त्या खाणीच्या सर्व बाजूंनी कुठेच कुंपण घातलेले नाही. तसेच कोणतेही धोके गांभीर्याने घेतले जात नाहीत. दरम्यान, खाणीच्या सुरुंग स्फोटांनी गावातील घरांना भूकंपासारखे धक्‍के बसत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. जुना धामणगाव या गावाच्या हद्दीमधील या खाणीला गौण खनिज उत्खननाची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, स्फोटकांची तीव्रता जास्त आहे. भविष्यात जीवितहानी झाल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. 

हेही वाचा - २००६ अन् यंदाच्या बर्ड फ्ल्यूमध्ये फरक, चिकन अन् अंडी खाण्याबाबत पशूसंवर्धन मंत्र्यांचा महत्वाचा...

खाणींवर हवारोधक भिंती उभारणे सक्तीचे असतानासुद्धा भिंती बांधण्याची तसदी कुठेच घेण्यात आलेली नाही. त्यामुळे गिट्टी तयार होताना मशिनरींमधून उडणारी धूळ सर्वत्र पसरते. याचा फटका खाणीशेजारी असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीला बसत आहे. धुळीने माखलेली जमीन नापिक बनत चालली आहे.
-मोहन सिंघवी, शेतकरी, शहापूर.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: peoples facing problem due to blasting in dhamangaon railway of amravati