ट्रेकिंगसाठी जाणाऱ्यांना आता पेर्जागडचा पर्याय; गडाच्या विकासाची आदित्य ठाकरेंकडे मागणी  

श्रीकांत पशेट्टीवार 
Tuesday, 24 November 2020

नागभीड तालुक्‍यात वसलेली ही टेकडी जंगलाने व्यापलेली आहे. या टेकडीच्या माथ्यावरुन अत्यंत सुंदर दृश्‍य दिसते. जवळजवळ एक तासाचा हा ट्रेक आहे. बहुतेक लोक पश्‍चिम महाराष्ट्रात ट्रेकिंगसाठी जात असतात

चंद्रपूर : सामान्यत: आपण पश्‍चिम महाराष्ट्रातील टेकड्यांवर ट्रकिंगला जातो. परंतु, चंद्रपूर जिल्ह्यात तळोधी गावाजवळ एक सुंदर स्थान आहे. ते पेर्जागड किंवा सात बहिणी टेकडी म्हणून ओळखले जाते. या टेकडीवर ट्रेक करण्याची हौस पूर्ण होणार आहे. त्याकरिता नमस्ते चांदा क्‍लबच्या माध्यमातून पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना पेजागडच्या विकास करण्याची मागणी केली आहे.

नागभीड तालुक्‍यात वसलेली ही टेकडी जंगलाने व्यापलेली आहे. या टेकडीच्या माथ्यावरुन अत्यंत सुंदर दृश्‍य दिसते. जवळजवळ एक तासाचा हा ट्रेक आहे. बहुतेक लोक पश्‍चिम महाराष्ट्रात ट्रेकिंगसाठी जात असतात. पण विदर्भातील या जागेवर लक्ष केंद्रित केल्यास स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. 

क्लिक करा - पीक वाचविण्यासाठी टँँकरने रस्त्यावर पाणी

सात बहिणी डोंगराची 459 मीटर उंची आहे. लांबून बघितल्यास किल्ल्यासारखे दिसते. कारण त्याच्या माथ्यावर मोठे खडक आहेत. प्राचीन काळापासूनची निवासी गुहा आणि मंदिरे अजूनही आहेत. 1964 पासून दरवर्षी पंचक्रोशीतील लोक मकरसंक्रांती आणि महाशिवरात्रीसारख्या उत्सवासाठी एकत्र जमतात. 

या टेकडीला नमस्ते क्‍लब चांदातर्फे पेजागडबद्दल जनजागृती अभियान राबविण्यात आले. युवकांनी या गडावर जाऊन गडाची साफसफाई केली. गडकिल्ले संवर्धनाचा प्रयत्न केला. या माध्यमातून नमस्ते चांदामधील युवकांनी पेजागडचा पर्यटनस्थळ म्हणून विकास व्हावा, अशी मागणी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना केली आहे. 

हेही वाचा - आता बांबूच्या बाटलीने प्या पाणी, नैसर्गिक चवीसोबत आरोग्याचंही रक्षण

यावेळी हितेश कोटकर, सागर मसादे, वैभव थोटे, अनिकेत सायरे, कमलेश चटप, सागर महाडोले, प्रितम खडसे, महेशचंद्र सोमनाथे, प्रणय दुर्वे, प्रवीण पाटील, यतिश मेश्राम, जगदीश रचावार, सिद्धांत नगरकर, रोशन कोंकटवार, चेतन इंगोले, झंकार साखरकर, अमित हिरादेवे, जितेश नान्हे, आदित्य पडीशालवार यांची उपस्थिती होती.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Perjogadh in Nagbhid is good option for trekkers in Vidarbha