व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी आत्मपरीक्षण करावे - जयसिंग चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

नागपूर - नियोजनबद्ध रीतीने प्रत्येकाला स्वत:ला घडवता येईल. तुम्ही आत्मपरीक्षण करीत स्वत:मधील उणे शोधा व ते प्रयत्नांनी भरून काढा. व्यक्तिमत्त्व विकासासाठी तुमच्या अंतरंगात डोकवा व आत्मपरीक्षण करा, असे आवाहन उद्योजक जयसिंग चव्हाण यांनी केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ निरंतर, प्रौढ शिक्षण व विस्तार विभागाच्या वतीने आयोजित ‘हिंमत-ए-मर्दा, तो मदद दे खुदा’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. गुरुनानक भवन येथे आयोजित कार्यक्रमाला कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, डॉ. मोहन काशीकर व माध्यम समन्वयक श्‍याम धोंड उपस्थित होते.

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी व मेहनत ही त्रिसूत्री लक्षात ठेवा. अपयशाने निराश न होता या त्रिसूत्रीने यश खेचून आणता येते. स्वत:ला सुधारण्यासाठी काही गोष्टी अवघड वाटतील, तेव्हा प्रयत्नांना सुसूत्रता, मुद्देसूदपणा याची जोड द्या. स्वत:शी स्पर्धा करा. घड्याळाला गुरू माना व वेळेचे नियोजन करा. आत्मविश्‍वास वाढवा, असेही चव्हाण म्हणाले.

या वेळी चव्हाण यांनी आयुष्यातील काही अनुभवही सांगून विद्यार्थ्यांपुढे आदर्श उभा केला. कुलगुरू डॉ. काणे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक श्‍याम धोंड यांनी केले. या वेळी युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Web Title: Personality development of students do self-examination