इंधन दरवाढीचा शेतकऱ्यांना फटका

विवेक मेतकर
शनिवार, 26 मे 2018

सोशल मीडियावर भावना तीव्र
शेतकरी सध्या खरिपाच्या पेरणीकरिता तयारीला लागले आहेत. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी ट्रॅक्‍टरद्वारे मशागतीची कामे करीत आहेत. पेट्रोल व डिझेलचे दर वाढल्यामुळे ट्रॅक्‍टरची भाडेवाढ झाली आहे. इंधन दरवाढीचा परिणाम सर्वचस्तरांतील घटकांसह प्रत्येक व्यवसायावर होत आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढीचा आलेख वाढतच चालला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सुध्दा तीव्र नाराजीच्या प्रतिक्रिया व्यक्‍त होत आहेत. इंधन दरवाढीचा जसा रोजच भडका होतो, तसा भडका व्हॉट्‌सॲप, फेसबुकसारख्या सोशल साईटवरही होताना दिसत आहे.

अकोला ः पेट्रोल, डिझेलच्या दरांत सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. बहुतांश शेतकरी शेतीची कामे ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने करतात. सध्या मशागतीची कामे सुरू असून, ट्रॅक्‍टरद्वारे होणाऱ्या कामांची भाडेवाढ झाल्यामुळे डिझेल दरवाढीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. या आठवड्यात इंधन दरवाढीने कहर केला असून, त्याचे तीव्र पडसाद सोशल मीडियावरही उमटू लागले आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने इंधनाच्या दरात वाढ होत आहे. सध्या जवळपास ८५ रुपये प्रतिलिटर पेट्रोल, तर डिझेलही ७२ रुपयांवर पोहचले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सोशल मीडियावर भावना तीव्र
शेतकरी सध्या खरिपाच्या पेरणीकरिता तयारीला लागले आहेत. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी ट्रॅक्‍टरद्वारे मशागतीची कामे करीत आहेत. पेट्रोल व डिझेलचे दर वाढल्यामुळे ट्रॅक्‍टरची भाडेवाढ झाली आहे. इंधन दरवाढीचा परिणाम सर्वचस्तरांतील घटकांसह प्रत्येक व्यवसायावर होत आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढीचा आलेख वाढतच चालला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सुध्दा तीव्र नाराजीच्या प्रतिक्रिया व्यक्‍त होत आहेत. इंधन दरवाढीचा जसा रोजच भडका होतो, तसा भडका व्हॉट्‌सॲप, फेसबुकसारख्या सोशल साईटवरही होताना दिसत आहे.

शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग
इंधनाच्या दरवाढीने सर्वसामान्य जनता होरपळून जात असताना शेतकऱ्यांनाही त्याचा फटका बसत आहे. ८० रुपयांच्या खाली पेट्रोल आणि ७० रुपयांच्या आत डिझेलचा दर असताना दरवाढ कमी होईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र, त्यानंतरही दरवाढीचा आलेख वाढतच गेल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांचाही अपेक्षांचा भंग झाला आहे.

Web Title: petrol diesel price hike farmer problem