नागपूरच्या औषध कंपनीतील आगीत कामगाराचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 डिसेंबर 2016

नागपूर - पिवळी नदी परिसरातील नितिका फार्मास्युटिकल कंपनीत शुक्रवारी रात्री (ता. 2) बॉयलर फुटल्यामुळे झालेल्या स्फोटात जखमी झालेल्या संदीप विनायक पनकुले (28, रा. मोठा इंदोरा) या कामगाराचा शनिवारी मृत्यू झाला. अन्य 23 जखमींवर उपचार सुरू आहे.

नागपूर - पिवळी नदी परिसरातील नितिका फार्मास्युटिकल कंपनीत शुक्रवारी रात्री (ता. 2) बॉयलर फुटल्यामुळे झालेल्या स्फोटात जखमी झालेल्या संदीप विनायक पनकुले (28, रा. मोठा इंदोरा) या कामगाराचा शनिवारी मृत्यू झाला. अन्य 23 जखमींवर उपचार सुरू आहे.

पिवळी नदी परिसरात अगदी अरुंद जागेत असलेल्या नितिका फार्मास्युटिकल्स कंपनीत औषधी गोळ्या आणि कॅप्सुलचे आवरण तयार केले जाते. या कंपनीत 300 कामगार कामावर आहेत. काल रात्री साडेनऊ वाजता दोन शिफ्टमध्ये असलेल्या अंतरात कर्मचारी बदलाचे काम सुरू होते. दहाच्या सुमारास कंपनीच्या इमारतीत असलेला बॉयलर अतिउष्णतेने फुटला. यात 23 जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर मेयो आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज दुपारी दोनच्या सुमारास 82 टक्‍के भाजलेल्या पनकुळे याचा मृत्यू झाला.

कंपनीतील पांडुरंग नावाच्या कामगाराची सायकल कंपनीच्या वाहनतळामध्ये दिसली. मात्र, तो कंपनीत व रुग्णालयातही आढळून आला नाही. त्यामुळे कंपनीत त्याचा मृत्यू झाला असावा वा तो मलब्याखाली तो दबला असावा, असा अंदाज आहे. या प्रकरणात यशोधरानगर पोलिसांनी कंपनी मालक, संचालक व व्यवस्थापकाविरुद्ध अद्याप गुन्हा दाखल केला नसल्याचे समजते.

दरम्यान, कंपनीत आज दिवसभर अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्याचे काम करीत होते. सायंकाळच्या सुमारास आग आटोक्‍यात आणण्यात यश आले. कंपनी परिसरात आज पोलिसांचा बंदोबस्त होता. मेयो रुग्णालयातही मोठ्या प्रमाणावर पोलिस ताफा होता. त्यामुळे दोन्ही ठिकाणांना पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.

Web Title: Pharma company boiler explosion in Nagpur

टॅग्स