दलितवस्तीच्या बांधकामाचे चित्रीकरण करा : बावनकुळे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

मौदा (जि.नागपूर) :  तांडावस्ती, ठक्कर बाबा आणि दलितवस्तीचे बांधकाम गुणवत्तापूर्ण करून त्याचे चित्रीकरण करा आणि ते पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी यांच्याकडे पाठवा, असे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मौदा येथील उपविभागस्तरीय आढावा बैठकीत ग्रामसेवकांना दिले.

जिल्ह्यातील कामठी आणि मौदा तालुक्‍याची उपविभागस्तरीय आढावा बैठक मौदा येथे राधाकृष्ण सभागृहात पार पडली. यावेळी उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, तहसीलदार प्रशांत सांगडे, मौदाच्या नगराध्यक्ष भारती सोमनाथे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सदानंद निमकर यांच्यासह जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी होते. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत काही शेतकऱ्यांनी यावेळी गाऱ्हाणी मांडली. संबंधित बॅंकांच्या अधिकाऱ्यांनी समन्वय साधून कर्जमाफी प्रकरणे निकाली काढण्याचे आदेश बावनकुळे यांनी दिले. त्याचप्रमाणे अतिक्रमणधारकांना पट्‌टे वाटप तत्काळ करावे, असे सांगताच सर्व्हर आणि मोबाईलवर येणाऱ्या अडचणी एका ग्रामसेवकाने सांगताच सभागृहात काही वेळ शांतता पसरली होती. याबाबत मंत्री बावनकुळे यांनी संबंधिताशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. मात्र, यावर लवकरच तोडगा काढून लवकरात लवकर पट्‌टे वाटप करावे, अशी सूचना दिली.आरोग्य विभाग, सिंचन विभाग, पाटबंधारे विभाग, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, भूमिअभिलेख विभाग, नगरपंचायत विभाग, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभाग, पंचायत समिती आदींसह विभागाचे अधिकारी यावेळी होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Picture the construction of Dalitwasti: Bawanakule