
डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी येथील नगरसेविका रंजना सुरेश पट्टेवार यांनी केली आहे. यासंबंधी पालिकेचे मुख्याधिकारी विपिन पालीवाल यांना निवेदन दिले आहे.
वर्धा : मोहननगर परिसरात डुकरांचा संचार वाढला आहे. कधी काळी हे डुकरं घरातही शिरतात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी येथील नगरसेविका रंजना सुरेश पट्टेवार यांनी केली आहे. यासंबंधी पालिकेचे मुख्याधिकारी विपिन पालीवाल यांना निवेदन दिले आहे.
हेही वाचा - सव्वा महिन्याच्या बाळाच्या खुनाचे रहस्य कायम; कुटुंबीयांनी पित्याला दिली घटनेची माहिती
प्रभाग क्रमांक 4 मोहन नगर येथील सौरभ धनवटे व बीसानी यांच्याकडून परिसरातील डुकरांचा त्रास होत असल्याच्या तक्रारी सतत येत आहेत. मोहननगर येथे दिवसेंदिवस हा त्रास वाढत असल्याचे या परिसरातील नागरिकांकडून कळविण्यात आले आहे. येथील नागरिकांना सकाळपासून या डुकरांच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. यामुळे त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा - स्मार्ट प्रसाधनगृहाची योजना रखडली, २६ पैकी फक्त सहाचे...
या भागात नगरसेविका म्हणून रंजना पट्टेवार काम करीत आहेत. सध्या सकाळपासूनच त्यांच्याकडे डुकरांचा त्रास होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. नगरसेविका म्हणून अनेकदा आरोग्य विभागाचे विशाल सोमवंशी यांच्याकडे वरील विषयाचा पाठपुरावा करणे सुरूच आहे. परंतु, अद्यापही कायमस्वरूपी न्याय मिळाला नाही.
हेही वाचा - इथे मृतदेहसुध्दा देतात जळण्यास नकार; स्मशानभूमीत गेल्या चार वर्षात एकही अंत्यसंस्कार नाही
केवळ डुकरेच नाही तर सुदामपुरी, मोहिनीनगर परिसरात मोकाट श्वानांचाही त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मोकाट श्वानांचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा याबाबत अनेकदा पाठपुरावा करूनही अद्यापही कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात आला नाही. वर्धा नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या टीमला त्वरित पाठवून वरील प्रमाणे दोन्ही अतिमहत्त्वाच्या सार्वजनिक प्रश्नांची त्वरित गंभीर दखल घेऊन मोहननगर येथील डुकरांचा व सुदामपुरी, मोहिनीनगर येथील मोकाट श्वानांचा त्वरित बंदोबस्त करून प्रभागातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी विनंती नागरिकांनी केली आहे.