गुलाबी बोंड अळी नियंत्रण प्रकल्प

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

नागपूर : केंद्रीय कापूस संशोधन संस्थेतर्फे "कीटक प्रतिकारक्षमता : गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन रणनीतींचा प्रसार' हा केंद्र शासन पुरस्कृत प्रकल्प बोथली, बेंदोली, चारगाव, सुराबर्डी व मुरादपूर या पाच गावांमध्ये राबविण्यात येत आहे.

प्रकल्पअंतर्गत पीकवाढीच्या अवस्थांनुरूप कीड नियंत्रणाच्या एकात्मिक उपायांबद्दल शेतकऱ्यांना विविध कार्यक्रमांद्वारे मार्गदर्शन करण्यात येत आहे. पाच गावांतील एकूण 50 लाभार्थी शेतकऱ्यांच्या शेतावर प्रात्यक्षिके लावण्यात आली आहेत. लाभार्थी शेतकऱ्यांना रसशोषक कीड नियंत्रणासाठी फ्लो निकामीड तसेच गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी एकरी दोन कामगंध सापळे व आर्थिक नुकसान पातळीच्या निकषानुसार फवारणीसाठी नीम तेल व क्‍लोरपायरीफॉस आदी निविष्ठा या प्रकल्पांतर्गत नुकत्याच वाटप करण्यात आल्या. सध्या कुठेही गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव नाही. परंतु, पुढील काही दिवसांत कपाशीला पात्या फुले लागण्याच्या वेळी या किडीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती केली जात आहे. प्रकल्पाचे नागपूर जिल्हा समन्वयक म्हणून सीआयसीआर नागपूरचे डॉ. सुभाष पाटील, संशोधन सहायक दीपक चापले, अभिषेक पातूरकर काम पाहत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pink bollworm control project