तीन लाखांची ‘प्लॅस्टिक करन्‍सी’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

नागपूर - महापालिकेने तिसऱ्या दिवशीही प्लॅस्टिक वापरकर्ते, विक्रेत्यांविरोधात कारवाई केली. आज महापालिकेच्या पथकाने दहाही झोनमधून दीड लाखाचा दंड वसूल केला. ही कारवाई महापालिकेच्या पथ्यावर पडली असून तीन दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत तीन लाखांची भर पडली. 

राज्य शासनाने लागू केलेल्या प्लॅस्टिक बंदीच्या तिसऱ्या दिवशीही महापालिकेच्या झोनमधील पथकांनी व्यापारी, वापरकर्त्यांवर कारवाई केली. सर्वाधिक मंगळवारी झोनमध्ये १९६ किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले.

सर्वाधिक ५० हजारांचा दंड आशीनगर झोनमधून वसूल करण्यात आला. त्यानंतर ३५ हजारांचा दंड मंगळवारी झोनमधून चक धरमपेठ, हनुमाननगर झोनमध्ये प्रत्येकी ११ हजार, धंतोलीत ५४००, लक्ष्मीनगरात १० हजार ४००, नेहरूनगरमध्ये सहा हजार, गांधीबागमध्ये १० हजार, लकडगंजमध्ये १५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपुरा झोनवगळता सर्वच झोनमधील कारवाईतून १ लाख ५३ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल  करण्यात आला. नऊ झोनमधून ४५०.१२५ किलोग्रॅम प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. 

तीन दिवसांत १० क्‍विंटल प्लॅस्टिक जप्त 
गेल्या तीन दिवसांत केलेल्या कारवाईत महापालिकेने ३ लाख १८ हजारांचा दंड वसूल केला. या कारवाईदरम्यान शहराच्या विविध भागातून दुकानदार, वापरकर्त्यांकडून १० क्‍विंटल प्लॅस्टिक  जप्त करण्यात आले. 

Web Title: plastic ban fine recovery