दीड लाखाचा दंड

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

नागपूर - प्लॅस्टिक बंदीच्या पहिल्याच दिवशी शहरातील विविध भागांत कारवाई करीत महापालिकेच्या पथकाने १ लाख ५५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. प्रतापनगर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. दिवसभरात ५३८ किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. 

नागपूर - प्लॅस्टिक बंदीच्या पहिल्याच दिवशी शहरातील विविध भागांत कारवाई करीत महापालिकेच्या पथकाने १ लाख ५५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. प्रतापनगर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. दिवसभरात ५३८ किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. 

प्लॅस्टिक बंदीवर आज प्रत्येक झोनमध्ये प्रत्येकी दहा सदस्यीय चमूने कारवाईला सुरुवात केली. प्रत्येक झोनमधील पथकाने शासन आणि प्रशासनाच्या दिशानिर्देशानुसार अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे ज्या प्लॅस्टिक पिशव्या आणि प्लॅस्टिक वस्तूंवर बंदी आहे, अशा प्लॅस्टिक विकणाऱ्या आणि वापरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली. या कारवाईअंतर्गत दहाही झोनमध्ये एकूण ३४ जणांना नोटीस देण्यात आली. लक्ष्मीनगर झोनअंतर्गत एका कारवाईदरम्यान दुकानदाराने पथकाशी हुज्जत घातली. त्यामुळे त्याच्या विरुद्ध पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात आला. दहाही झोन मिळून एकूण ५३८ किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे. एकूण १ लाख ५५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार यांनी दिली. 

प्लॅस्टिक बंदीअंतर्गत सर्व दुकाने व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे, बसस्थानके, रेल्वेस्थानके, वने व संरक्षित वने, इकोसेन्सेटिव्ह क्षेत्र आदी ठिकाणी कारवाई होईल. दुकानदार, मॉल्स, कॅटरर्स, घाऊक व किरकोळ विक्रेता, वितरक, वाहतूकदार, मंडई, स्टॉल्स आदी ठिकाणीही कारवाई होईल. बंदी असलेल्या प्लॅस्टिकचा वापर बंद करा. याकरिता नागरिकांनी स्वत: पुढाकार घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त वीरेंद्र सिंग यांनी केले.

Web Title: plastic ban fine recovery crime