रुग्णांशी खेळ! मेडिकलमधील विषबाधा उपचार केंद्र थंडबस्त्यात

file photo
file photo

नागपूर : विदर्भात सर्प, विंचवासह विविध प्राण्यांच्या दंशामुळे दगावलेल्यांची संख्या दरवर्षी चारशेपेक्षा अधिक असते. विषबाधेचा मृत्यूदर कमी करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) पहिले विषबाधा उपचार केंद्र स्थापन करण्याचे निश्‍चित केले होते. परंतु, दोन वर्षे लोटल्यानंतरही हे केंद्र कागदावर आहे.
बंगळूरचे सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. थुप्पील व्यंकटेश यांनी पुढाकार घेत उपराजधानीत विषबाधा उपचार केंद्र स्थापन करण्याचे संकेत दिले होते. डॉ. व्यंकटेश "लेड पॉयझनिंग प्रिव्हेंशन ग्रुप'चे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांनी मेडिकलमध्ये भेट दिली होती. मध्य भारतातील तीन राज्यांना मोठ्या प्रमाणावर घनदाट जंगले लाभली आहेत. येथे साप, विंचू आदी प्रकारचे विषारी प्राणी आहेत. त्यांच्या दंशामुळे विषबाधा झालेले रुग्ण उपराजधानीत मेडिकलमध्ये येतात.
2017 मध्ये देशात एक लाख 61 हजार 487 सर्पदंशाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यातील 36 हजार 60 सर्पदंश महाराष्ट्रातील आहेत. 2018 मध्ये सुमारे 34 हजार सर्पदंशाच्या घटनांची नोंद सार्वजनिक आरोग्य विभागाकडे झाली आहे. यातील 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त घटना विदर्भातील असल्याची माहिती आहे. पुणे येथील खासगी संस्थेने असे केंद्र सुरू केले आहे. शासकीय संस्थेत पहिल्या केंद्राचा मान मेडिकलला मिळणार होता; परंतु सध्या हा प्रस्ताव थंडबस्त्यात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com