स्मार्ट कार्डच्या नावावर वृद्धांची लूट!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

जलालखेडा (जि. नागपूर) : राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठांना स्मार्ट कार्ड देण्यासाठी योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. हे काम महामंडळाने खासगी कंपनीला दिले आहे. कंपनीचे प्रतिनिधी गावागावांत जाऊन स्मार्ट कार्ड काढत आहे. मात्र, वृद्धांकडून 150 रुपये घेत 70 रुपयांची पावती देत लूट केली जात आहे.

राज्य परिवहन महामंडळाने वृद्धांना अर्ध्या तिकीटमध्ये प्रवास करता यावा यासाठी नियमात बदल करून स्मार्ट कार्ड देण्याचा निर्णय घेतला. याचे काम आगर स्थळी सुरू असून, 50 रुपये भरून स्मार्ट कार्ड निघत आहे. वृद्धांना त्रास होऊ नये म्हणून महामंडळाने खासगी कंपनीलाही कंत्राट दिले आहे. खासगी कंपनीचे प्रतिनिधी गावात जाऊन ग्रामपंचायत कार्यालयात शिबिर लावून स्मार्ट कार्ड काढत आहे. परंतु, यासाठी वृद्धांकडून 150 रुपये घेत आहे. पावती मात्र 70 रुपयांची देत आहे. महामंडळाचे अधिकारी यावर काहीच करायला तयार नाही.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: plunder old men in the name of smart card!