

Janjatiya Gaurav Diwas PM Modi Highlights New Development Era in Maoist Affected Areas With 246 Projects Worth 3000 Crore
esakal
गडचिरोली: माओवादी हिंसाचाराच्या प्रभावातून बाहेर पडत देशातील आदिवासीबहुल भाग विकासाच्या नव्या पर्वात प्रवेश करत आहेत. दुर्गम गावांपर्यंत शिक्षण, आरोग्य, निवास, रोजगार आणि पायाभूत सुविधांचा विस्तार होत असून आदिवासी समाजाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडत आहे. यंदा जिल्ह्यात दिवाळीच्या दिव्यासोबत आशेची ज्योत पेटली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.