लैंगिक छळातील आरोपी पोलिस कोठडीत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

अकोला - क्रीडा संकुलमधील जिम्नॅस्टिकच्या अल्पवयीन खेळाडूंवर लैंगिक छळ करणाऱ्या प्रशिक्षकाला बुधवारी न्यायालयाने सोमवारपर्यंत (ता. 26) पोलिस कोठडी सुनावली. या वेळी काही मुद्दे न्यायालयासमोर आले असून, त्या दिशेने तपास करण्याचा आदेश न्यायालयाने पोलिसांना दिला.

वसंत देसाई क्रीडा संकुल येथे अमॅच्युअर जिम्नॅस्टिक असोसिएशनचा प्रशिक्षक मुकेश तुंडलायत याच्या विरुद्ध मंगळवारी (ता. 20) अल्पवयीन खेळाडूंवर लैंगिक अत्याचारप्रकरणी "पॉस्को' अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी न्यायालयीन कोठडीत असताना सोमवारी आणखी दोन पीडित खेळाडूंनी पोलिसांत तक्रार केली होती. परंतु, पोलिसांनी गुन्हा दाखल न करता दोन्ही प्रकरणे चौकशीत ठेवली होती. अखेर काल पोलिसांनी दोन्ही तक्रारींवरून गुन्हा दाखल केला. नव्याने दाखल गुन्ह्यावर सुनावणीसाठी तुंडलायतला तिसरे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. जाधव यांच्यासमोर हजर करण्यात आले. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यावर न्यायालयाने आरोपीला येत्या 26 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली,
 
Web Title: Police accused of sexual abuse in its custody