पोलिसाचा आई-वडिलांसह पत्नीवर हल्ला

file photo
file photo

नागपूर : परस्त्रीसोबत प्रेमसंबंध ठेवू नको, अशी तंबी कुटुंबीयांनी दिल्याने संतापलेल्या गिट्टीखदान पोलिस ठाण्यातील हेडकॉन्टेबलने आपल्या आई-वडिलांसह पत्नीवरच खुर्चीने हल्ला केला. मानकापूर पोलिसांनी मिळालेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून, आरोपी पसार आहे.
सूरजलाल बालक देवभुते (52, रा. राठी ले-आउट, झिंगाबाई टाकळी, नागपूर) असे आरोपीचे नाव आहे. तो गिट्टीखदान पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. त्याला आई-वडील, पत्नीसह एक मुलगा व एक मुलगी आहे. त्याचे एका दुसऱ्या महिलेसोबत गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू आहे. एकदा सूरजलालच्या मुलाला ते दुसऱ्या महिलेसोबत वाहनावर जाताना दिसले. त्याने ही माहिती घरी दिली. घरच्यांनी माहिती काढली असता त्याचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू असल्याचे पुढे आले. त्यावरून संपूर्ण कुटुंबीयांनी सूरजलालवर रोष व्यक्त केला. आरोपीची सत्तर वर्षीय आई अनूबाई यांनी मुलाला पुढे इतर स्त्रीसोबत प्रेमसंबंध न ठेवण्याची तंबी दिली. सूरजलाल त्यावर संतापला. त्याने जवळ असलेल्या खुर्चीच्या पाट्याने अचानक आईवरच हल्ला चढवला. हा प्रकार बघून धावलेल्या वडील, पत्नीवरही त्याने हल्ला करून पळ काढला. तातडीने जखमी अनूबाईला जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवले असता तिला सुमारे 14 टाके लागले. अनूबाईच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com