
नाकाबंदी दरम्यान पोलिस जवान योगेश्वर काळेवार यांचा मृत्यू
कुरखेडा (जि. गडचिरोली) - पोलिस स्टेशन कुरखेडा येथे कार्यरत पोलिस शिपाई (Police Constable) योगेश्वर काळेवार (Yogeshwar Kalewar) (वय ३४) यांचा मंगळवार (ता. ८) दुपारी तीन वाजताच्या सुमारास कर्तव्यावर असताना प्रकृती अस्वस्थ होत मृत्यू (Death) झाला. त्यांना हृदयघाताचा झटका (Heart Attack) आला असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिस शिपाई योगेश्वर काळेवार हे मंगळवारी दुपारी येथील नवीन बसस्थानकासमोर पोलिस चमूद्वारे लावण्यात आलेल्या नाकाबंदी वाहन तपासणी मोहिमेत सहभागी होते. दरम्यान, दुपारी २.३० वाजताच्या सुमारास त्याना अस्वस्थ वाटू लागल्याने सहकारी जवानांनी त्यांना जवळच असलेल्या शहरातील खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले.
हेही वाचा: अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूर की मुंबईत? याच आठवड्यात निर्णय
मात्र, उपचारा दरम्यान दुपारी तीन वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा अकस्मात मृत्यूची माहिती मिळताच येथील पोलिस अधिकारी, कर्मचारी रुग्णालयात पाेहाेचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून उत्तरीय तपासणीनंतर कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. योगेश्वर काळवार यांचे मूळ गाव वाढोणा ता. नागभीड जि.चंद्रपूर आहे. ते गडचिरोली जिल्हा पोलिस दलात २०१३ मध्ये शिपाई पदावर रूजू झाले होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली व बराच मोठा आप्त परीवार आहे.
Web Title: Police Constable Yogeshwar Kalewar Death During Nakabandi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..