Loksabha 2019 : नागपूर शहरात कडेकोट बंदोबस्त 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

असा आहे बंदोबस्त 
पोलिस कर्मचारी - सहा हजार 
सीआयएसफ - एक कंपनी 
एसआरपीएफ- दोन कंपन्या 
होमगार्ड- 1,800

नागपूर - आचारसंहिता लागताच शहरातील नाक्‍याजवळ आत येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. गुन्हेगारांची धरपकड करण्यात येऊन दोन हजारांपेक्षा अधिक गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधक कारवाई केली आहे. अवैध दारूविक्रेत्यांविरुद्धही कारवाई करण्यात येत आहे. निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलिस सज्ज आहेत. शहरात 52 संवेदनशील बूथ आहेत. या बूथवर विशेष पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. 

मंगळवारी सायंकाळपासूनच झोपडपट्ट्यांजवळ पोलिसांचे फिक्‍स पॉइंट लावण्यात येणार आहे. रात्री 10 वाजतानंतर पाचपेक्षा अधिक लोक एकत्र आढळल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल. पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना गस्त वाढविण्याचे निर्देश दिले आहे. मतदानाच्या दिवशी पोलिस उपायुक्त स्ट्रायकिंग फोर्ससह शहरात गस्त घालतील. पोलिस आयुक्त, पोलिस सहआयुक्त सर्वच या दिवशी रस्त्यावर असतील. निवडणूक बंदोबस्तात सहा हजार पोलिस कर्मचारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची एक कंपनी, राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन कंपन्या, 1,800 होमगार्ड, दंगलविरोधी पथक, शीघ्र कृती पथक मतदानाच्या दिवशी शहरात तैनात करण्यात येणार आहे. महसूल विभागातील कर्मचारी व पोलिस कर्मचाऱ्यांची एकूण 18 पथकेही शहरात गस्त घालत आहे. 

असा आहे बंदोबस्त 
पोलिस कर्मचारी - सहा हजार 
सीआयएसफ - एक कंपनी 
एसआरपीएफ- दोन कंपन्या 
होमगार्ड- 1,800

Web Title: Police deployed in Nagpur for election