esakal | गडचिरोलीत पोलिसांना मोठं यश; नक्षल्यांचा शस्त्र कारखाना केला उद्ध्वस्त; गृहमंत्र्यांकडून कौतूक
sakal

बोलून बातमी शोधा

{"A?":"B","a":5,"d":"B","h":"www.canva.com","c":"DAERspJsD6g","i":"ZrGdgpLMmQdrSXyw0lSx8Q","b":1614962169532,"A":[{"A?":"I","A":26.02350499316684,"B":774.9721833106712,"D":160.351591515192,"C":49.271670847395356,"a":{"B":{"A":{"A":"MAEV6fUobl0","B":1},"B"

गुरुवारी (ता. ४ मार्च) विशेष अभियान पथकाचे (सी-६०) जवान महाराष्ट्र-छत्तीसगढ राज्य सीमेवरील मुरुमभुशी गावाजवळील जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवत होते.

गडचिरोलीत पोलिसांना मोठं यश; नक्षल्यांचा शस्त्र कारखाना केला उद्ध्वस्त; गृहमंत्र्यांकडून कौतूक

sakal_logo
By
मिलिंद उमरे

गडचिरोली ः गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात असलेल्या अतिदुर्गम अबुझमाड जंगल परिसरात नक्षलवाद्यांचा शस्त्रास्त्रे तयार करण्याचा कारखाना पोलिसांनी एका साहसी मोहिमेत उद्ध्वस्त केला. ४८ तासांहून अधिक काळ ही मोहीम सुरू होती. या मोहिमेत एक पोलिस जवान जखमी झाला.

गुरुवारी (ता. ४ मार्च) विशेष अभियान पथकाचे (सी-६०) जवान महाराष्ट्र-छत्तीसगढ राज्य सीमेवरील मुरुमभुशी गावाजवळील जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवत होते. त्यावेळी त्यांना या भागात काही संशयास्पद नक्षली कारवाया दिसून आल्या. पोलिसांना पाहताच नक्षल्यांनी गोळीबार केला. पोलिसांनीही त्याला चोख प्रत्युत्तर दिल्याने घनदाट जंगलाचा फायदा घेऊन नक्षल्यांनी पळ काढला.

हेही वाचा  - उपराजधानीत पुन्हा कोरोनाचा उद्रेक; आजची रुग्णसंख्या बघून सरकेल पायाखालची जमीन 

त्यानंतर पोलिसांनी या परिसरात शोध मोहीम राबविली असता, त्यांना तेथील एका नक्षली कॅम्पमध्ये शस्त्रास्त्रे तयार करण्याचा कारखानाच आढळून आले. शस्त्रे बनविण्यासाठीची यंत्रसामुग्री तेथे होती. पोलिसांनी ही सारी यंत्रसामुग्री उद्ध्वस्त केली. तेथून परतताना नक्षल्यांनी परत पोलिस पथकावर गाळीबार केला. त्यालाही पोलिसांनी चोख उत्तर दिले.

या परिसरात थेट शस्त्रांचा कारखानाच आढळून आल्याने या भागात आणखी नक्षली दबा धरून बसले असल्याचा संशय बळावला होता. त्यामुळे आज शुक्रवारी या परिसरात परत शोध घेण्यासाठी सी-६०चे जवान पाठविण्यात आले. त्यांच्यावर परत नक्षल्यांनी हल्ला चढवला. परंतु पोलिसांनी त्याला प्रत्युत्तर देत नक्षल्यांचे मोठे नुकसान केले व नक्षली हल्ला परतवून लागला. या हल्ल्यात एक जवानाच्या पायाला गोळी लागून तो जखमी झाला. त्याला पुढील उपचारासाठी हेलिकॉप्टरने रवाना करण्यात आले आहे.

हेही वाचा - बापरे! गाडी ढकलत नेणाऱ्या युवकाला आधी केली मदत अन् मग घडली भयंकर घटना  

या मोहिमेत छत्तीसगड पोलिसांनी सहकार्य केल्याची माहिती मिळाली आहे. नक्षल्यांचा शस्त्र कारखाना उद्ध्वस्त करण्यात यश मिळवल्याबद्दल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गडचिरोली पोलिसांचे कौतुक व अभिनंदन केले आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 
 

loading image