esakal | सलाम! दबंग पोलिस कर्मचाऱ्याने जीव धोक्‍यात घालून वाचवले बापलेकीचे प्राण

बोलून बातमी शोधा

dabang

चिमूर तालुक्‍यातील शंकरपुर येथील वार्ड क्रमांक 5 मधील सार्वजनिक विहिरीमध्ये रात्री साडेआठच्या दरम्यान तीन वर्षीय मुलगी खेळताना पडली. तिला वाचविण्याकरिता तिच्या वडिलांनीही विहिरीत उडी मारली, मात्र त्यांना पोहता येत नसल्याने दोघेही गटांगळ्या खायला लागले. यावेळेस गस्तीवर असलेले पोलिस शिपाई नागरगोचे यांनी विहिरीत उडी घेऊन दोघांचेही प्राण वाचवले आणि खरे हिरो ठरले .

सलाम! दबंग पोलिस कर्मचाऱ्याने जीव धोक्‍यात घालून वाचवले बापलेकीचे प्राण
sakal_logo
By
जितेंद्र सहारे

चिमूर (जि. चंद्रपूर) : सद्रक्षणाय,खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्‍य असलेल्या महाराष्ट्र पोलिस विभागातील प्रत्येकच कर्मचारी जनतेच्या सेवेसाठी वचनबद्ध असतो. थंडी वारा पाऊस कशाचीही पर्वा न करता पोलिस कर्मचारी कुठल्याही कठीण परिस्थितीत आपली ड्युटी बजावत असतात. आणि नेहमीच जनतेच्या सेवेसाठी धाऊन जात असतात. याचा परीचय नुकताच एका घटनेने करून दिला.
चिमूर तालुक्‍यातील शंकरपुर येथील वार्ड क्रमांक 5 मधील सार्वजनिक विहिरीमध्ये रात्री साडेआठच्या दरम्यान तीन वर्षीय मुलगी खेळताना पडली. तिला वाचविण्याकरिता तिच्या वडिलांनीही विहिरीत उडी मारली, मात्र त्यांना पोहता येत नसल्याने दोघेही गटांगळ्या खायला लागले. यावेळेस गस्तीवर असलेले पोलिस शिपाई नागरगोचे यांनी विहिरीत उडी घेऊन दोघांचेही प्राण वाचवले आणि खरे हिरो ठरले .
एखाद्या कथा कादंबरी अथवा चित्रपटामध्ये शोभेल अशी घटना भिसी पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या शंकरपूर येथे घडली. शंकरपूर पोलिस चौकीचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक जांभळे आपल्या कर्मचाऱ्यासह गावात गस्तीवर असताना, त्यांना वॉर्ड क्रमांक 5 मध्ये सार्वजनिक विहिरीवर गर्दी आणि आरडाओरड सुरू दिसली .त्यामुळे त्यांनी जवळ जाऊन चौकशी केली असता प्रभाकर बारेकर यांची तीन वर्षीय मुलगी शिवन्या खेळता खेळता विहरीत पडली आणि तिला वाचविण्याकरीता तिचे वडिल प्रभाकर यांनीही उडी घेतल्याचे कळले. मात्र त्यांना पोहता येत नसल्याने दोघेही गटागंळ्या खात होते.

सविस्तर वाचा - काय सांगता...! लॉकडाऊननंतर असं बदललं देहव्यापाराचं गणित
 
पोलिस पथकात असलेले शिपाई परमेश्वर नागरगोचे यांनी क्षणाचाही विचार न करता आपला मोबाईल व पाकि ट सहकाऱ्याकडे देऊन विहिरीत 15 फुट पाणी असलेल्या 40 फुट खोल विहिरीत उडी घेतली. आकण गटांगळ्या खाणाऱ्या बापलेकींना गावकऱ्यांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले. दोघांनाही शंकरपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. उपचारादरम्यान दोघांचीही प्रकृती सुधारली आहे. हे सर्व स्वतःच्या जिवाची पर्वा न करता विहीरीत उडी घेणाऱ्या पोलिस दादा नागरगोजे यांच्या जिगरबाजपणामुळे शक्‍य झाले. अशा या खऱ्या हिरोला शंकरपुर वासीयांनी सॅल्युट करीत त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.