काय सांगता..! लॉकडाउननंतर असं बदललं देहव्यापाराचे गणित

अनिल कांबळे
शनिवार, 30 मे 2020

तरुणी लॉकडाउन अगोदर एका रात्रीचे 10 हजार रुपये घेत होत्या त्या तरुणींवर आता केवळ हजार ते 1200 रुपये घेण्याची वेळ आली आहे. तसेच ग्राहकांच्या प्रत्येक मागणीला होकार देण्याचा अलिखित नियम ठरविण्यात आला आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून बेरोजगार असलेल्या सेक्‍स रॅकेटमध्ये काम करणाऱ्या तरुणींना आता ग्राहकांकडून निघालेल्या कमीत कमी पैशावर होकार द्यावा लागत आहे. 

नागपूर : कोरोनामुळे मोठमोठ्या व्यवसायांचे नुकसान झाले आहेत. तसेच त्याचा परिणाम सेक्‍स रॅकेटमधील दलालांकडे ऑडर्सवर काम करणाऱ्या सेक्‍स वर्कर्सवरही झाला आहे. एकेकाळी दहा हजार रुपये रेट घेणाऱ्या सेक्‍स वर्कर्स यांना आता हजार ते बाराशे रुपयांवर तडजोड करावी लागत आहे, अशी धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. 

विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा परिणाम झाल्यामुळे देहव्यापाराला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. एकमेकांच्या संपर्कातून होणाऱ्या कोरोनामुळे अनेकांनी सतर्कतेचा, सावधानीचा पवित्रा घेतला आहे. परंतु, अनेक आंबटशौकीनांनी लॉकडाउन शिथिल होताच पुन्हा ब्युटी पार्लरमधील मुली, हॉटेलमधील स्टाफ गर्ल्स, बीअरबारमधील बारगर्ल्स आणि सेक्‍स रॅकेटमधील तरुणींशी संपर्क साधणे सुरू केले आहे. त्यासाठी मोबाईल फोन आणि वॉट्‌सऍवर मॅसेजचे सुरू झाले आहेत. 

हेही वाचा - तिसरे मंगलाष्टक सुरू झाल्यावर वधू म्हणाली, "तू मला पसंत नाहीस"

मात्र, ज्या तरुणी लॉकडाउन अगोदर एका रात्रीचे 10 हजार रुपये घेत होत्या त्या तरुणींवर आता केवळ हजार ते 1200 रुपये घेण्याची वेळ आली आहे. तसेच ग्राहकांच्या प्रत्येक मागणीला होकार देण्याचा अलिखित नियम ठरविण्यात आला आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून बेरोजगार असलेल्या सेक्‍स रॅकेटमध्ये काम करणाऱ्या तरुणींना आता ग्राहकांकडून निघालेल्या कमीत कमी पैशावर होकार द्यावा लागत आहे. 

आंबटशौकीन ग्राहकांचे नखरे

पूर्वी सेक्‍स रॅकेटमधील तरुणी ग्राहकांना भाव देत नव्हत्या. तरुणींच्या मर्जीप्रमाणे ग्राहकांना वागावे लागत होते. मात्र, आता ग्राहक राजा झाला आहे. त्यामुळे आंबटशौकीन ग्राहकांचे नखरे तरुणींना सहन करावे लागत आहेत. पूर्वी पॉश हॉटेलमधील एसी रूमची डिमांड करणारी तरुणी आता लॉज किंवा ढाब्यावरील पंखा नसलेल्या खोलीतही ग्राहकांना होकार देत असल्याची स्थिती आहे.

अधिक माहितीसाठी - आंबटशौकिनांच्या मागणीत प्रचंड वाढ... बंद ब्यूटी पार्लर, ढाब्यांमध्ये रंगतोय खेळ

दलालांच्या कमिशनलाही कात्री

सेक्‍स रॅकेटमधील दलाल दहा ते 25 हजार रुपयांमध्ये तरुणींना पोहोचवून देण्यासाठी "सौदा' करीत होते. यामध्ये मौजमजेसाठी जाणाऱ्या तरुणींना जवळपास 4 ते 5 हजार रुपये मिळत होते. परंतु, आता ग्राहकांची अपेक्षा पूर्ण करताना दलालांच्या नाकी नऊ येत आहेत. त्यामुळे दलालांच्या कमिशनलाही कात्री लागलेली आहे. 

ग्राहकांच्या टीपवर सेक्‍स वर्कर्स 

आंबटशौकीनांना खुश केल्यानंतर जो पैसा टीप म्हणून देण्यात येतो, तीच खरी कमाई सेक्‍स रॅकेटमधील तरुणींची असते. कारण, दलाल त्याचे कमिशन म्हणून 60 ते 70 टक्‍के पैसे सौदा होताच कापून घेतो. त्यामुळे ग्राहकांनी दिलेली शे-पाचशेची टीप तरुणींसाठी मोठी ठरत आहे. त्या पैशातून भडक मेकअप करण्यासाठी कीट, पावडर, परफ्युम आणि पेट्रोल-पाण्याचा खर्च करण्यात येत असल्याची माहिती एका तरुणीने दिली आहे. 

महत्त्वाची बातमी -  सासूने हात पकडले, सासऱ्याने अंगावर रॉकेल शिंपडले, पती गळ्यावर वार करणार तोच...

जेवणाचेही वांदे

लॉकडाउनमुळे ग्राहकच येत नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. जवळ पैसे नाही. खायला अन्न नाही. धंदा करता येत नाही. कोणी मदत करणार तरी किती?, लॉकडाउनमुळे मोठे हाल होत आहे. काय करावे आणि काय नाही, असा प्रश्‍न सतत मनात येतो, अशी माहिती वारांगणाने दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown changes the prostitution business and rate