पोलिसांसाठी फिरते उपाहारगृह

अनिल कांबळे
सोमवार, 2 जुलै 2018

नागपूर - पावसाळी अधिवेशनासाठी शहरात अडीच हजार पोलिस कर्मचारी तैनात असून, त्यांच्या सोयीसाठी पोलिस आयुक्‍तांनी फिरत्या उपाहारगृहाची व्यवस्था केली आहे. त्यामुळे बंदोबस्तातील प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याला जागेवरच चहा-नाश्‍ता आणि जेवण मिळणार आहे. 

पावसाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी शहरात आलेल्या पाहुण्या पोलिस कर्मचाऱ्यांना योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पोलिस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम्‌ यांनी पुढाकार घेतला आहे. केवळ वर्दी आणि कपड्यांची बॅग हातात घेऊन बंदोबस्तासाठी उपराजधानीत दाखल झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना राहण्याची उत्तम सोय करण्यात आली. तसेच त्यांना

स्नानासाठी गरम पाणी, चहा, नाश्‍ता याकडेही विशेष लक्ष देण्यात आले आहे. या वर्षी पहिल्यांदाच फिरत्या उपाहारगृहाच्या साहाय्याने पोलिस कर्मचाऱ्यांना बंदोबस्ताच्या ठिकाणी चहा, कॉफी, नाश्‍ता मिळणार आहे.

त्यासाठी आठ पोलिस वाहनांमध्ये फिरते उपाहारगृहाची व्यवस्था केली आहे. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एकदा तैनात झाल्यानंतर बंदोबस्तस्थळ सोडता येत नाही. चहा, कॉफी किंवा नाश्‍ता करायचा असल्यास अडचणी येतात. ही अडचण लक्षात घेता पोलिस आयुक्‍तांनी फिरत्या उपाहारगृहाची व्यवस्था केली आहे. हे वाहन दिवसभर बंदोबस्तस्थळावर फिरणार आहे.

मोफत मेडिकल सुविधा
बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या सर्वच पोलिस कर्मचाऱ्यांची आरोग्याची काळजी पोलिस आयुक्‍त घेणार आहेत. रोज मोफत वैद्यकीय तपासणी करण्याची सुविधा पोलिस नियंत्रण कक्षात केली आहे. डॉक्‍टर, नर्स आणि स्टॉफची व्यवस्था करण्यात आली आहे.

बंदोबस्‍तातील पोलिसांसाठी दहा रुपयांत जेवण
पाहुण्या पोलिस कर्मचाऱ्यांना केवळ दहा रुपयांत जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिस कर्मचाऱ्यांना दहा रुपयांचे कुपन वाटण्यात आले आहे. बंदोबस्तस्थळावर जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. केवळ दहा रुपयांत जेवण मिळणार असल्याने पोलिसांसाठी उत्तम सोय झाली आहे. यामुळे पोलिसांच्या चेहऱ्यावर हास्य खुलणार आहे.

Web Title: police the food mobile