पोलीस जमादाराकडून गतिमंद मुलीशी चाळे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जुलै 2018

खामगाव - दारूच्या नशेत तर्रर्र होऊन गतिमंद मुलीशी लगट करू पाहणाऱ्या पोलीस जमादारास नागरिकांनी चांगलाच चोप दिला. टॉवर चौकात २८ जुलैच्या रात्री पावणेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला. मुलीजवळ गेलेला जमादार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. 

खामगाव - दारूच्या नशेत तर्रर्र होऊन गतिमंद मुलीशी लगट करू पाहणाऱ्या पोलीस जमादारास नागरिकांनी चांगलाच चोप दिला. टॉवर चौकात २८ जुलैच्या रात्री पावणेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला. मुलीजवळ गेलेला जमादार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. 

शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला एक पोलीस हेड कॉन्स्टेबल नेहमीच दारूच्या अंमलात असतो. २८ जुलैच्या रात्री त्याने तर्रर्र होईपर्यंत दारू ढोसली होती. रात्री पावणेबाराच्या सुमारास टॉवर चौकातून जात असताना त्याला एक गतिमंद मुलगी आढळून आली. तिच्या मागे पुढे कोणीच नसल्याने ती कुठेही आसरा घेते. या मुलीजवळ जाऊन त्याने चाळे करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार काही नागरिकांनी पाहिला. संतापलेल्या नागरिकांनी जमादाराची यथेच्छ धुलाई केली. मुलीशी लगट करणारा पोलीस शेजारील एका दुकानासमोर बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.

याप्रकरणी अद्याप पोलिसांत तक्रार दाखल झाली नव्हती. तर या घटनेची माहिती पोलिसांना देणारे प्रत्यक्षदर्शी सामाजिक कार्यकर्ते नितेश खरात यांनी वकिलांशी चर्चा करून पोलिसात तक्रार करू असे सांगितले.

या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू आहे. त्यात काही आढळल्यास तसेच प्रत्यक्षदर्शींनी तक्रार दिल्यास दोषीविरुद्ध गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई केली आहे. पोलीस कर्मचारी आहे म्हणून पाठीशी घातले जाणार नाही.
- संतोष ताले, ठाणेदार शहर

Web Title: police girl atrocity crime